गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट|Cancer Reserch | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cancer
गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट|Cancer Reserch

गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट

कर्करोगाचा सामना जगातील अनेक लोकं करत आहेत. त्यापासून वाचण्यासाठी लोकांना विविध प्रयत्न कराने लागतात. कर्करोग (Cancer) स्त्री-पुरूष, काळा गोरा असा वर्णभेद मानत नाही. पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाचे निष्कर्ष (Study) आश्चर्यकारक आहेत. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या कॅंसर रिसर्च युकेने नुकताच त्यांचा संशोधन (Reserch) अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार कृष्णवर्णिय आणि आशियाई लोकांना कर्करोगाचा धोका कमी आहे. त्यातुलनेत गोऱ्या लोकांना कर्करोगाचा धोका जास्त आहे.

हेही वाचा: स्तनाच्या कर्करोगाचे रक्त तपासणीमुळे होणार लवकर निदान

असे आले निष्कर्ष - इंग्लंडमध्ये २०१३ ते २०१७ या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या कर्करोगाच्या प्रकरणांच्या आधारावर हे संशोधन करण्यात आले. त्याचे निष्कर्ष आता प्रसिद्ध करण्यात आले आहेत, असे संशोधकांनी सांगितले. संशोधनातील निष्कर्षानुसार गोऱ्या लोकांच्या तुलनेत आशियाई लोकांना कर्करोग होण्याचा धोका ३८ टक्के कमी होता. तर कृष्णवर्णिय लोकांना तो ४ टक्के कमी होता. तर त्याचवेळी मिश्रवर्णाच्या लोकांना हा धोका ४० टक्के होता.

हेही वाचा: कर्करोगापासून बचाव करायचाय! 'हे' तीन पदार्थ खा

Dark-Complexion-and-Fair-Complexion

Dark-Complexion-and-Fair-Complexion

म्हणून गोऱ्या लोकांना धोका जास्त- बीबीसीच्या अहवालानुसार, गोऱ्या लोकांना त्वचेच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्यांच्या त्वचेचे नुकसान जास्त होते. पण, याआधी झालेल्या संशोधनात, गोर्‍या लोकांपेक्षा कृष्णवर्णीय लोकांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे समोर आले होते.

काळ्या लोकांना धोका कमी - कृष्णवर्णीय आणि आशियाई समुदायातील लोकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त नसण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचे धूम्रपानाचे कमी प्रमाण असणे हे आहे, असे संशोधक सांगतात. यामुळेच गोर्‍या लोकांपेक्षा कृष्णवर्णीय लोकांमध्ये आतडी, स्तन आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी असतो.

हेही वाचा: डार्क चॉकलेट खाल्ल्याने कर्करोगापासून होऊ शकतो बचाव, अभ्यासात स्पष्ट

UKमध्ये वाढली समस्या

बीबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गोऱ्या लोकांच्या तुलनेत कृष्णवर्णीय आणि आशियाई लोकांमध्ये कर्करोगाबाबत असामानता आहे. संशोधक कॅटरीना ब्राऊन यांच्या मते. अशा लोकांमध्ये कर्करोगाचा धोका विविध कारणांमुळे निर्माण होतो. त्यात व्यक्तीचे वय, पालकांकडून मिळालेले जीन्स यावरही ते बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. युकेमधील कर्करोगाच्या ४० टक्के प्रकरणांमध्ये जीवनशैलीत बदल केले तर या समस्या टाळता येऊ शकतात, असे त्या म्हणाल्या. ब्रिटीश जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, यूकेमध्ये कर्करोगाची प्रकरणे वाढत आहेत. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या लोकांमध्ये कॅन्सर कसा विकसित होतो हे संशोधनाद्वारे समजेल, असे त्या म्हणाल्या .

हेही वाचा: मृत्यूच्या १५ मिनिटं आधी व्यक्ती काय विचार करते? वैज्ञानिकांचा दावा

Web Title: White People Are More Prone To Cancer Results In New Research

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top