Vitamin D Absorption Tips: व्हिटॅमिन D सप्लिमेंटचा योग्य परिणाम हवा आहे? मग 'या' ३ चुका टाळाच

Common Mistakes People Make While Taking Vitamin D Supplements: व्हिटॅमिन D सप्लिमेंट घेताना होणाऱ्या ३ सामान्य चुका जाणून घ्या आणि त्याचा पूर्ण फायदा कसा घ्यावा ते शिका.
Common Mistakes To Avoid Whule Consuming Vitamin D Supplements
Common Mistakes To Avoid Whule Consuming Vitamin D Supplementssakal
Updated on

Best Way to Take Vitamin D for Maximum Absorption: हाडांच्या मजबूतीसाठी आणि शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन D ची आवश्यकता असते. सूर्यप्रकाशातून, तसेच मासे, अंड्याचे पिवळे बलक आणि मांस यातून आपल्याला व्हिटामिन D पूरक प्रमाणात मिळते. पण प्रत्येकालाच हे पदार्थ खाणे शक्य असते असे नाही. त्यामुळे अनेकजण सप्लिमेंट्सच्या माध्यमातून व्हिटॅमिन D घेतात.

परंतु बऱ्याचदा असे दिसून येते की पूर्ण माहिती न घेता आणि त्या सप्लिमेंट्स घेण्याची योग्य पद्धत जाणून ना घेता त्याचे सेवन केले जाते. यामुळे योग्य ते परिणाम दिसून येत नाहीत आणि प्रभावही होत नाही. तुम्हाला जर याचे अपेक्षित परिणाम हवे असतील तर पुढे दिलेल्या चुका चुकूनही करू नका.

व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स घेताना टाळायच्या चुका

- व्हिटमनी K२ चे महत्त्व

कॅल्शियमचे काम फक्त हाडे मजबूत करणे नाही, तर ते योग्य ठिकाणी पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी शरीरात व्हिटॅमिन K2 असणे गरजेचे असते. हे कॅल्शियमला हाडे आणि दातांपर्यंत पोहोचायला मदत करते आणि धमन्यांमध्ये त्याचे साठून राहणे टाळते.

Common Mistakes To Avoid Whule Consuming Vitamin D Supplements
Imran Hashmi Tests Dengue Positive: इम्रान हाश्मीला डेंग्यूची लागण; पावसाळ्यात असे करा कुटुबांचे संरक्षण

K2 चा एक प्रकार ,MK7, खास करून हाडांमध्ये कॅल्शियम साठवून ठेवतो आणि काही प्रमाणात कॅन्सरपासूनही संरक्षण करतो असे संशोधन सांगते. त्यामुळे तुम्ही जर व्हिटॅमिन D घेत असाल, तर त्यासोबत K2 असणंही तितकेच गरजेचे आहे.

- मॅग्नेशियमची कमतरता

व्हिटॅमिन D योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते. जर तुम्ही व्हिटॅमिन D चे सप्लिमेंट नियमित घेत असाल, तर मॅग्नेशियमही तितक्याच प्रमाणात घेतले पाहिजे. कारण व्हिटॅमिन D शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवते आणि मॅग्नेशियम त्याचे संतुलन राखून हृदयाचे संरक्षण करते.

- सर्व व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स सारखे नसतात

व्हिटॅमिन D सप्लिमेंट्सची गुणवत्ता आणि बायोअ‍व्हेलिबिलिटी (शरीरात शोषले जाण्याची क्षमता) वेगवेगळी असते. एका अभ्यासानुसार, D3 इंजेक्शन किंवा D3 + D2 गोळी घेतल्यास शरीरातील सिरम व्हिटॅमिन D चे प्रमाण D2 इंजेक्शनच्या तुलनेत अधिक वाढते. त्यामुळे कोणता प्रकार प्रभावी आहे हे लक्षात घेऊन निवड करावी.

Common Mistakes To Avoid Whule Consuming Vitamin D Supplements
Belly Fat in Men: कॉर्पोरेट जीवनशैली आणि तणाव – पुरुषांमध्ये पोट सुटण्याची मुख्य कारणं! वजन नियंत्रणासाठी जाणून घ्या प्रभावी उपाय

त्यामुळे व्हिटॅमिन D चे सप्लिमेंट घेताना मॅग्नेशियम व K2 यांचे योग्य प्रमाण असणे, दर्जेदार सप्लिमेंट निवडणे आणि वैद्यकीय सल्ल्यानेच सेवन करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात त्याचे शोषण होणार नाही आणि अपेक्षित परिणामही मिळणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com