Belly Fat in Men: कॉर्पोरेट जीवनशैली आणि तणाव – पुरुषांमध्ये पोट सुटण्याची मुख्य कारणं! वजन नियंत्रणासाठी जाणून घ्या प्रभावी उपाय

Reasons for Sudden Weight Gain in Men Due to Stress: कॉर्पोरेट जीवनशैली आणि तणावामुळे पुरुषांमध्ये पोट सुटण्याचं प्रमाण वाढलं आहे—यावर उपाय आणि आरोग्य टिप्स जाणून घ्या.
Men' Health Guiden| Men's Weight Loss Tips
Men' Health Guiden| Men's Weight Loss Tipssakal
Updated on

Simple Daily Habits to Control Weight for Working Men: गणपती बाप्पांच्या बारा नावांपैकी लंबोदर हे नाव सर्वांनाच परिचित आहे. अशी "लंबोदर' किंवा पोट सुटलेली व्यक्ती पाहणे आपल्या कोणालाच नवीन नाही. पोटाचा आकार वाढण्याचे सर्वांत जास्त वेळा आढळणारे कारण म्हणजे मेदवृद्धी. सफरचंदाच्या आकाराची (apple shaped) व पेअरच्या आकाराची (pear shaped) अशी दोन प्रकारची मेदवृद्धी होते.

यांपैकी सफरचंदाच्या आकाराच्या मेदवृद्धीने पोट सुटते, तर पेअरच्या आकाराप्रमाणे झालेल्या मेदवृद्धीत नितंब व मांड्यांचे आकार वाढतात. मेदवृद्धी अनेक प्रकारच्या विकारांना आमंत्रित करते. मेदवृद्धीने शरीर बेढब दिसते; एवढेच नव्हे तर टाइप-टू मधुमेह, हृदयविकार, हृदयाच्या कार्यशक्तीत घट होणे, कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराईड्‌स या मेदांची पातळी वाढणे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्याचा (blocks) आजार होणे, पित्ताशयाला सूज येणे व त्यात खडे होणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, निद्रानाशाचा त्रास होणे, खुबा व गुडघा या सांध्यांची झीज होऊन osteoarthritis होणे, रक्तदाब वाढणे असे विकार मोठ्या प्रमाणात आढळतात.

Men' Health Guiden| Men's Weight Loss Tips
Foods to Cut Prostate Risk: प्रोस्टेट कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी पुरुषांनी 'हे' 6 सुपरफूड्स न चुकता खाल्ले पाहिजेत

हे लक्षात घ्या

- पोटाचा घेर वाढण्यामागे चार एफ पैकी एखादे कारण असते. चार एफ म्हणजे फॅट (fats) वृद्धी, फ्लेट्‌स (flatus) - पोटात वायू साठणे, फ्लुईड (fluid) - पोटात पाणी साचणे किंवा जलोदर होणे, फीट्‌स (foetus) - गर्भवती स्त्री.

- पाचवे कारण म्हणजे पोटात गाठ (tumor) हे होय.

- सामान्यपणे पुरुषांमध्ये 25 बीएमआय (body mass index) असणे, हे वजन योग्य असल्याचे प्रमाण मानले जाते.

- बीएमआय आणि waist to hip ratio दोन्ही महत्त्वाचे आहेत.

- आरोग्याच्या दृष्टीने वजन आणि ठेवण दोन्ही आपल्या शरीररचनेचे महत्त्वाचे भाग आहेत.

- जीवनसंघर्ष तीव्र झाल्याने कॉर्टिसॉलचा स्राव वाढतो व रक्तातील इन्शुलिनची पातळी वाढते व पोटातील मेदाचा साठा वाढतो.

- आनुवंशिकता, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अति ताणतणाव, रात्री उशिरा व भरपेट जेवणे, दारू, नॉन-व्हेज आहाराचे अतिरेकी सेवन, जीवनातील संघर्ष यांच्या एकत्रीकरणामुळे पोट सुटते व सुटतच राहते.

- हे सर्व टाळायचे असल्यास आहारावर नियंत्रण म्हणजेच calorie management, भरपेट न्याहारी व कमी कमी उष्मांकांचे दुपारचे व रात्रीचे जेवण, चल पद्धतीचे कोणतेही व्यायाम, ताणतणावांचे योग्य नियोजन, ध्यान व प्राणायाम, अत्यंत सोपा व बिनखर्चाचा उपाय म्हणजे सूर्यनमस्कार; पालेभाज्या व शिरांच्या भाज्या, योग्य प्रमाणात पाणी पिणे, असे हमखास उपाय होत.

Men' Health Guiden| Men's Weight Loss Tips
Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

- महिन्याभरांत 10 किलो वजन कमी करा अशा जाहिरातींचे बळी होऊ नका.

- एकदम एका महिन्यात खूप वजन कमी होणे आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते.

- योग्य वैद्यकीय सल्ला व आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

- Liposuction हा उपायदेखील घातक ठरू शकतो.

(सकाळ अर्काईव्हमधून)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com