जलप्रदूषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water pollution health issue skin ph coliform bacteria

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या गुणवत्तेतील कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक बदल,

जलप्रदूषण

बालमित्रांनो, काल आपण पाण्याचा उद्‍भव आणि त्याचे महत्त्व जाणून घेतले. आपण आता थोडी माहिती जलप्रदूषण म्हणजे काय, ते कसे होते याविषयी घेऊया. जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या गुणवत्तेतील कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक बदल, की ज्याचा ते वापर करणाऱ्या सजीवांवर विध्वंसक व विपरीत परिणाम होतो.

पाण्याच्या प्रदूषणाचे काही निकष ठरवलेले आहेत त्याप्रमाणे पाण्याचा सामू (पी.एच.) ६.५ ते ८.५ यामध्ये असायला हवा. त्यात कोलिफार्म जंतूचे प्रमाण प्रति लिटर ५० पेक्षा कमी असायला हवे. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन सहा मिलिग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त असावा. या निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सूक्ष्मजंतू, पाण्याचा ऑक्सिजन किंवा इतर गोष्टी आढळल्या तर ते प्राणी प्रदूषित आहे असे समजले जाते.

उद्योग, शेती, पिकातील कीटकनाशके, मासेमारी, फेकलेला कचरा, ऊर्जा प्रकल्प, वेगाने होणारे शहरीकरण इत्यादी मानवनिर्मित घटक पाण्याचे प्रदूषण करत असतात. त्याचप्रमाणे पाणी हे काही नैसर्गिक कारणांनीही दूषित होत असते, जसे की आम्लवर्षा, भूकंप, ज्वालामुखी, वादळ, खारे पाणी मिसळणे, बॅक्टेरियाची वाढ आदी. या सर्व प्रदूषणाचा परिणाम म्हणजे वेगवेगळे रोग होणे, गॅस्ट्रो, कावीळ, जुलाब, डोळे येणे, पोटाचे विकार आदी. दूषित पाण्यामुळे जमिनीही दूषित होते आणि त्यातली सुपीकता कमी होते. पुढील भागात अन्य परिणाम पाहूयात.

टॅग्स :pollutionhealth