Early Weight Loss साठी ‘या’ भाज्यांचा ज्यूस ठरेल फायदेशीर, आजच डाएटमध्ये सामिल करा हेल्दी Vegetable Juice

जर तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी किंवा खासकरून विविध भाज्या बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर तुम्ही आम्ही सांगितलेले काही भाज्यांचे ज्यूस तुम्ही तुमच्या Weight loss Diet मध्ये समाविष्ट करू शकता
Early Weight Loss साठी भाज्यांचे ज्यूस
Early Weight Loss साठी भाज्यांचे ज्यूसEsakal

हेल्दी राहण्यासाठी वजन नियंत्रणात असणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र वाढतं वजन ही सध्या अनेकांसाठी एक मोठी समस्या ठरू लागली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप, ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांचं वजन वाढू लागलं Weight Gain आहे. Marathi Diet Tips Healthy vegetable juices for early weight loss

धावपळीच्या दिनचर्येमध्ये अनेकांना वर्कआऊट Workout किंवा व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तसंच हेल्दी किंवा सकस आहार उपलब्ध होत नसल्याने मिळेल ते जंक फूड Junk Food खाण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे.

अशावेळी झटपट होणारे आणि तितकेच पोषक असे पदार्थ आहारामध्ये सामील करून तुम्ही वजन नियंत्रणात Weight Control ठेवू शकता. तसंच वजन कमी देखील करू शकता. यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे भाज्यांचे ज्यूस.

जर तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी किंवा खासकरून विविध भाज्या बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर तुम्ही आम्ही सांगितलेले काही भाज्यांचे ज्यूस तुम्ही तुमच्या Weight loss Diet मध्ये समाविष्ट करू शकता. भाज्यांच्या ज्युसमुळे शरीराला आवश्यक असलेली पोषक त्तत्व मिळतील शिवाय वजन कमी होण्यासही मदत होईल.

पालक ज्यूस- पालकचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पालकमध्ये आयर्नसोबतच मोठ्या प्रमाणत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि सी उपलब्ध असतं. तसचं पालकामध्ये डाएट्री फायबर मुबलक प्रमाणात उपल्बध असल्याने जास्त काळ पोट भरलेलं राहतं आणि सतत भूक लागत नाही. तसचं पालकामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

दुपारी जेवणात किंवा संध्याकाळी तुम्ही पालक ज्युसचं सेवन करू शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही मदत होईल.

हे देखिल वाचा-

Early Weight Loss साठी भाज्यांचे ज्यूस
Workout Tips रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे का? जाणून घ्या फायदे व तोटे

गाजर ज्यूस- तुमच्या वेटलॉस डाएटमध्ये तुम्ही गाजराच्या ज्यूसचा समावेश करू शकता. गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात ज्यामुळे वजन कमी करणं सोप्प होतं. गाजराच्या ज्युसमुळे वजन कमी होण्यासोबतच तुमचे केस, त्वचा आणि डोळे निरोगी राहण्यास मदत होते.

कोबी ज्यूस- कोबीच्या ज्यूसमुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर टाकण्यास मदत होते. या ज्यूसच्या सेवनामुळे पोट फुगणे किंवा पचनाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कोबीच्या ज्यूसमुळे जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटत असल्याने तुम्हाला सतत भूक लागत नाही. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

दूधी ज्यूस- दूधी भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असून अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी दूधी भोपळ्याच्या ज्यूसचं सेवन फायदेशीर ठरतं. शिवाय यामुळे शरीर थंड आणि हायड्रेट राहण्यासही मदत होते.

याशिवाय वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये काकडीचा ज्यूस, कारल्याचा ज्यूस आणि बीटच्या ज्यूसचा समावेश करणं फायद्याचं ठरू शकतं.

हे देखिल वाचा-

Early Weight Loss साठी भाज्यांचे ज्यूस
Workout At Home For Weight Loss पावसामुळे जिममध्ये जाता येत नाहीय? वजन घटवण्यासाठी घरच्या घरी करा हे 5 सोपे व्यायाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com