Workout At Home For Weight Loss पावसामुळे जिममध्ये जाता येत नाहीय? वजन घटवण्यासाठी घरच्या घरी करा हे 5 सोपे व्यायाम

पावसाळ्यात जॉगिंग किंवा साधे चालणे यासारखे व्यायाम करणेही कठीण होते. पण केवळ बदलत्या ऋतुमुळे वर्कआऊट रूटीनमध्ये खंड पडता कामा नये. फिटनेससाठी (workout at home without equipment) घरच्या घरीही साधेसोपे व्यायाम करू शकता.
Workout At Home
Workout At Home Sakal

Fitness At Home News : पावसाळ्यामुळे कडाक्याच्या उष्णतेपासून आराम मिळतो, हे खरे. पण फिटनेस प्रेमींसाठी हा ऋतू समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यात जॉगिंग करणे किंवा केवळ चालणेही कठीण होते.  मुसळधार पाऊस असल्यास जिम गाठणे कठीणच. 

Workout At Home
Kriti Sanon Fitness : म्हणूनच क्रिती दिसते स्लीम अँड फिट, हे आहे क्रितीचं फिटनेस सीक्रेट

पण म्हणून तुमच्या फिटनेस रूटीनला ब्रेक देऊ नका. वजन घटवण्यासाठी, फिट राहण्यासाठी आपण घरच्या घरीही सोपे व्यायाम (indoor workouts) प्रकार करू शकता. फॅन बर्न करण्यासाठी घरामध्ये कोणते एक्सरसाईज (indoor workouts in monsoon in marathi) करता येतील, याची माहिती जाणून घेऊया. 

पावसाळ्यात घरच्या घरी करा हे पाच व्यायाम (weight loss exercise at home)

स्ट्रेचिंग  (stretching)

स्ट्रेचिंगचे एक्सरसाईज घरच्या घरी सहजरित्या करता येणे शक्य आहे. व्यायामाची सुरुवात नेहमी स्ट्रेचिंगनेच करावी. त्यामुळे व्यायाम करताना स्नायूंवर फारसा ताण पडत नाही. यासाठी सरळ उभे राहून दोन्ही हात वर करून संपूर्ण शरीर वर खेचा, नंतर पुढे वाकून पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम दहा वेळा करावा.

Workout At Home
Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे

पुशअप्स  (Push Ups)

पुशअप्स हा व्यायाम प्रकारही आपण घरामध्येच करू शकता.  यासाठी सर्वप्रथम जमिनीवर मॅट पसरवून पोटावर झोपा. हाताचे तळवे खांद्याजवळ ठेवा. आता तळवे आणि बोटांच्या बळावर शरीर वरील बाजूस उचला व यानंतर पुन्हा खाली न्यावे. पण शरीर जमिनीला टेकणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या क्षमतेनुसार हा व्यायाम करावा. 

Workout At Home
Dragon Fruit Benefits: सकाळी रिकाम्या पोटी खा ड्रॅगन फ्रुट, मिळतील जबरदस्त फायदे

रोप स्किपिंग ( Rope Skipping )

रोप स्किपिंग म्हणजे दोरी उड्या मारणे हा देखील घरामध्ये सहज करता येतो. कार्डिओ व्यायामांमधील या व्यायाम टॉप 5 मध्ये गणला जातो. यामुळे हृदयाच्या आरोग्यासोबतच शरीरातील रक्ताभिसरणही वाढते व पायांचे स्नायू मजबूत होतात. नियमित दोरी उड्या मारल्यास शरीरातील कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते.

Workout At Home
वाढलेलं वजन झपाट्याने कमी करायचंय? प्या 'या' भाज्यांचे सूप
स्क्वॅट्स (Squats)

स्क्वॅट्स हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये थोडेसे अंतर ठेवावे. यानंतर हात खांद्याच्या रेषेत आपल्या चेहऱ्यासमोर आणा.  आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवून खाली वाका पण जमिनीवर बसण्याची चूक करू नका. यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत यावे. सुरुवातीस 5 स्क्वॅट्स करून नंतर सराव करून संख्येत वाढ करावा.

डान्सिंग ( Dancing)

डान्सिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासही लाभ मिळतात. त्यामुळे आपल्या वर्कआऊट रूटीनमध्ये या व्यायामाचा आवर्जून समावेश करावा. नियमित नृत्य केल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com