- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट सांगितली जाते, ‘जास्त खाल्लं, म्हणून वजन वाढलं.’ म्हणजेच वजनवाढीचं कारण फक्त ‘कॅलरी इन-कॅलरी आउट’ या गणितात शोधलं जातं. मात्र, फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर चित्र खूप वेगळं आहे. वजनवाढीचं मूळ कारण अनेकदा केवळ जास्त कॅलरी नव्हे, तर आपल्या हार्मोन्समधील बिघाड असतो.