मी १८ वर्षांची आहे. माझे वजन फक्त ३७ किलो आहे. वजन वाढण्यासाठी काही उपाय सुचवावा. जिमला जाणे योग्य राहील का हेही कृपया सांगावे...
- स्वाती मालपे, मुंबई
उत्तर - या वयात कमी वजन असणे चुकीचे नाही, पण शरीरशक्ती उत्तम असणे मात्र आवश्यक असते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी रोज शरीराला अभ्यंग करावा. यासाठी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल वापरणे उत्तम. तसेच संतुलन फेमिसॅन सिद्ध तेलाचा पिचू ठेवणे चांगले. सकाळी स्नानाआधी संतुलन सुहृद सिद्ध तेल हलक्या हाताने छातीवर चोळावे, या सर्व उपायांनी वातशमन होऊन शरीराची शक्ती वाढायला मदत मिळेल.
सकाळ-संध्याकाळ गाईचे चांगले दूध संतुलन शतावरी कल्प वा स्त्री संतुलन कल्प घालून घेणे उत्तम. संतुलन च्यवनप्राश व सॅन रोझसारखे रसायन सुद्धा नियमित घेण्याचा फायदा मिळू शकेल. आहारात साजूक तूप, दूध, लोणी, खारकेची पूड, सुका मेवा, शिंगाडा, फळे, भाज्या वगैरे आवर्जून समावेश असावा. पाळीशी संबंधित काही त्रास असला तर तज्ज्ञांकडून योग्य उपचार नक्की करावा. ताकद सुधारेपर्यंत जिमला जाणे टाळावे.