माझे वय ४५ वर्षे आहे. गेली २-३ वर्षे माझे वजन वाढते आहे. बरेच उपाय केले, पण वजन कमी होत नाही. हल्ली बऱ्याचदा चिडचिड होते, सतत थकवा जाणवतो. रजोनिवृत्तीच्या काळ असल्यामुळे हे त्रास होत आहेत, असे डॉक्टर म्हणतात. सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. कृपया यावर उपाय सुचवावा.
- ज्योत्स्ना भोंडवे, पुणे
उत्तर - चाळिशी उलटल्यानंतरचा काळ स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळ म्हणतायेतो. किमान ५-६ वर्षे मेनोपॉझसंबंधित समस्या जास्त प्रमाणात होताना दिसतात. थोडे वजन वाढणे, थकवा जाणवणे, थोड्या प्रमाणात चिडचिड होणे स्वाभाविक आहे. पण फार जास्त प्रमाणात त्रास होऊ लागला तर मात्र स्त्री-संतुलनासाठी वैद्यांचा सल्ला घेऊन औषधे सुरू करणे उत्तम राहील.
सध्या संतुलनचे फेमिसॅन सिद्ध तेल व फेमिनाइन बॅलन्स आसव नियमाने घेणे सुरू करावे. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांची स्त्री संतुलन ही सीडी नियमित ऐकावी. एकूणच आरोग्य व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने योग, प्राणायाम, किंवा आवडत असल्यास डान्स रुटिन वगैरे करावे. प्राणायामाला महत्त्व द्यावे कारण त्यामुळे शारीरिक व मानसिक ताकद वाढायला मदत मिळते तसेच भावनिक ताकदही वाढते.
जेवणाचे सर्व नियम पाळणे, वेळेत जेवणे, चुकीच्या गोष्टी न खाणे-पिणे, आवश्यकता वाटल्यास घरच्यांची मदत घेणे आवश्यक. तसेच स्वतःचे काही छंद जोपासण्याचाही फायदा होऊ शकतो. हॉट फ्लशेस वगैरेंचा त्रास होत असल्यास संतुलन पित्तशांती गोळ्या, कूलसॅन सिरप घेण्याची मदत होऊ शकेल. पंचकर्म व उत्तरबस्ती करण्याचाही फायदा मिळू शकेल.