black sesame: बहुगुणी काळ्या तिळाचे काय काय आहेत आरोग्यदायी फायदे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

black sesame

black sesame: बहुगुणी काळ्या तिळाचे काय काय आहेत आरोग्यदायी फायदे?

काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहेत.काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळे तीळ स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरले जातात. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काळ्या तिळाचा आहारात समावेश केल्याने कोण-कोणते फायदे होतात. हे आज आपण बघणार आहोत

● हाडांच्या आरोग्यासाठी काळ्या तिळाचे फायदे : काळ्या तिळामुळे दात आणि हाडांचे संरक्षण होते. कारण आवश्यक कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे, फॉस्फरसयामध्ये पोटॅशियम आणि झिंक सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. काळ्या तिळाचे तेल ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव करण्यास देखील मदत करते. 

● स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काळे तिळ मदत करतात : सकाळी रिकाम्या पोटी आपण काळे तीळ आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. मात्र, तीळ आणि मध एकत्र खाल्ल्यावर एक तास दुसरे काहीही खाणे टाळा.

हेही वाचा: Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात 'ही' झाडे लावा, घरात राहिल सदैव पैसाच पैसा

● हृदयाकरता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत काळे तिळ : काळे तीळ हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. जर दररोज सुमारे 10 ते 12 काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतो.

● डोळ्याची दृष्टी उत्तम ठेण्यास काळे तिळ मदत करतात : काळ्या तिळाचे नियमितपणे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असते त्यांनाही आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजेत.

हेही वाचा: Winter 2022: हिवाळ्यात लवंगाचा चहा का प्यावा?

● वजन कमी करण्यास  देखील उपयुक्त आहेत काळे तिळ : काळे तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवावे लागेल. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खा. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.

● केसांसाठी काय महत्त्वाचे आहेत काळे तिळ : काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात.

हेही वाचा: Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने बाजरीचा खिचडा कसा तयार करायचा?

● चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते : दोन ते तीन ग्रॅम काळे तीळ दररोज खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतात. याशिवाय दमा आणि खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी काळे तीळ फायदेशीर आहेत.

● त्वचेसाठी काळ्या तिळाचे फायदे : हे ओमेगा 3 फॅटी ऍसिडच्या उच्च सामग्रीसह त्वचेच्या आरोग्याचे रक्षण करते. हे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करून त्वचेचे स्वरूप सुधारते.

त्वचेमध्ये कोलेजेन हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे जो तयार होण्यास मदत करतो.

टॅग्स :lifestylehealth