Blood Pressure : रक्तदाब म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे, आसने अन् उपाय

Blood Pressure : हा आजार इतर आजारांना निमंत्रण देतो व प्रकृतीची गुंतागुंत वाढवण्यास कारणीभूत ठरतो.
Blood Pressure
Blood Pressureesakal
Updated on

Blood Pressure : बदलत्या जीवनशैलीने अनेक आजार वाढले. त्यात रक्तदाबाचा आजार देखील आहे. हा आजार इतर आजारांना निमंत्रण देतो व प्रकृतीची गुंतागुंत वाढवण्यास कारणीभूत ठरतो. नियमित उपचारासोबत योगाची जोड दिल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करता येते.

अलीकडे रक्तदाब हा एक फार मोठा आजार झाला आहे. आधुनिक जीवनशैलीचा हाती एक दुष्परिणाम आहे. यातून पुढे डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडाचे पक्षापात. हृदयविकार असे विकार होऊ शकतात. हे विकार झाल्याचे लवकर लक्षात येत नाही.

पण वेळेवर निदान झाल्यास यावर नियंत्रण विकार, मिळविता येते, सर्वसाधारणपणे प्रौढ माणसाचा रक्तदाब हा, १२० mm Hg (systolic) तर खालील ८० mm Hg (Diastolic) असतो. जर अनेक वेळा तो १६०/१०० पेक्षा अधिक आढळला तर त्याला उच्च रक्तदाब झाला आहे, असे समजतात.

Blood Pressure
Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ‘या’ ड्रायफ्रूट्सचा समावेश केल्याने, लवकर मिळेल आराम

आसने

  • उभ्याने करावयाची आसने : ताडासन, वृक्षासन अर्थ कटी चक्रासन, त्रिकोणासन इ.

  • बैठी आसने : वज्रासन, उष्ट्रासन, गौमुखासन

  • पाठीच्या कण्याला पीळ देणारे आसने : कक्रासन, अर्थ मत्स्येन्द्रासन- पोटावरील आसने : भुजंगासन, शलभासन इ.

  • पाठीवर निजून करावयाची आसने ः अर्थ हलासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन

  • विश्रांतीसाठी : शवासन न्यात डोके खाली व पाय वर जातात अशी आसने बिलकूल करू नयेत.

  • मुद्रा सिंह मुद्रा, ब्रहा मुद्रा

  • प्राणायाम: भागशः श्वसन, नाडीशुद्धी, बंद्रानुलोम, भ्रमरी (पण कुंभक म्हणजे श्वास रोखणे, अजिबात करू नये.)

  • मानसिक उपाय भजन, प्रार्थना, ओंकारजप, ध्यान व मौन

उपयुक्त योग शारीरिक पातळीवरील उपचार

  • सूक्ष्म व्यायाम : यामुळे शरीर मोकळे होते, ताकद व क्षमता वाढते.

  • हातापायांचे व्यायाम, कंबरेचे, खांद्याचे व्यायाम, उड्या मारणे

  • शुद्धीक्रिया : नेती, कपालभाती, अग्निसार, धौती इ.

रक्तदाब म्हणजे काय

आपले हृदय म्हणजे एक पंपच. ते अखंड धडधडत असते. आपल्या शरीरात सर्वत्र रक्तपुरवठा करीत असते. त्यावेळी रक्तवाहिनीच्या भिंतीवर जो दाब पडतो तो म्हणजे रक्तदाब, हा सर्व साधारण १२०/८० असतो, तेव्हा शरीरातल्या सर्व क्रिया सुरळीत चालतात.

कारणे

  • खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा

  • अपुरी व अवेळी झोप

  • व्यायामाचा अभाव

  • व्यसने, ताणतणाव व अयोग्य आहार

  • रक्तवाहिन्या मध्ये स्निग्ध पदार्थ, कोलेस्टेरोलचा थर तयार होणे

लक्षणे

  • छातीत दुखणे

  • धडधडणे

  • थकवा येणे

  • श्वास गुदमरणे

  • मळमळणे

  • अंधारी/चक्कर येणे

  • कोरडा घाम येणे

अशी लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरकडे जावे.

Blood Pressure
Women’s Health: शारिरीक तंदूरूस्तीसाठी महिलांनी तिशीनंतर 'या' सुपरफूड्सचा आहारात करावा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com