Child Care Tips: 6 ते 12 महिन्याच्या बाळांना चुकूनही 'हे' पदार्थ खायला देऊ नका, यकृत होऊ शकते खराब

डॉक्टरांच्या मते ६ ते १२ महिन्याच्या बाळांना कोणते पदार्थ खायला देणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.
Child Care Tips:
Child Care Tips: Sakal

Child Care Tips: लहान मुलांच्या आरोग्यासह खाण्या-पिण्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. जन्मानंतर बाळ 6 महिने फक्त आईचे दूध पिते आणि त्यानंतरच अन्नाचे सेवन करायला सुरूवात करतात. पण काही पदार्थ असे आहेत जे एक वर्षाचे होईपर्यंत देणे टाळावे.

६ ते १२ महिन्याच्या बाळांना काय खायला द्यावे?

या वयाच्या बाळांना भिजवलेले बदाम, किशमिश,काजू खायला देऊ शकता. पण याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मुलांना अर्ध्या वाटीपेक्षा जास्त ज्युस देऊ नका.

मीठ आणि साखर

लहान मुलांना जास्त मीठ आणि साखर खायला देऊ नका. कारण हे पदार्थ किडनीच्या आरोग्यासाठी चांगले नाही. तुमच्या मुलाच्या पदार्थांमध्ये किंवा स्वयंपाकाच्या पाण्यात मीठ घालू नका. तसेच मुलाला गोड स्नॅक्स आणि शीतपेयांपासून दूर ठेवा.

Child Care Tips:
Child Care Tips: लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या 'या' समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात मधुमेहाची लक्षणे

6 महिन्याच्या बाळाला काय खायला देऊ नये?

सहा महिन्याच्या बाळाला आईस्क्रीम, फळे, चॉकलेट, चिप्स, बिस्किटे, म्हशीचे दूध, मीठ आणि साखर यासारखे पदार्थ देऊ नका. यामुळे मुलांच्या यकृताचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच तळलेले पदार्थ,तुपकट पदार्थ, पराठा यासारखे पदार्थ देणे टाळावे.

फळ आणि भाज्या

डॉक्टरांच्या मते बाळांना दिवसभरात एकापेक्षा जास्त चपात्या खायला देऊ नका. मुलांना फळे आणि भाज्यांचे सूप द्यावे. जर मुलाला जुलाब होत असेल तर त्याला मूग डाळ खिचडी खायला द्यावी. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास मुले कमी आजारी पडेल. सध्याच्या बदलत्या वातावरणात मुलांची काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com