Hemoglobin Level In Children : मुलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी किती असावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या

तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, तेव्हा पेशींना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही
Hemoglobin Level In Children
Hemoglobin Level In Childrenesakal

Hemoglobin Level In Children : हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. हे प्रोटीन आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये आढळते. या पेशींमध्ये लोह असते. ऑक्सिजन आणि लोह एकत्र मिळून हिमोग्लोबिन तयार होते. जेव्हा तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, तेव्हा पेशींना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. रक्त तपासणीद्वारे हिमोग्लोबिनची योग्य पातळी कळते. हिमोग्लोबिन ग्रॅम प्रति डेसीलिटर (g/dL) मध्ये मापले जाते. चला तर शरीरात हिमोग्लोबिनची पातळी किती असावी ते जाणून घेऊया.

पुरुषाच्या शरीरातील हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी १२ किंवा त्याहून अधिक असते आणि स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी १३ किंवा त्याहून अधिक असावी. वृद्धांचे हिमोग्लोबिन थोडे कमी असते कारण त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता असते आणि आजारांमुळे ते जास्त औषधे खातात.

ज्याप्रमाणे प्रौढांच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सामान्य असते, त्याचप्रमाणे मुलांमध्येही हिमोग्लोबिनची पातळी सामान्य असते. जर हिमोग्लोबिन मुलांच्या शरीरात प्रमाणापेक्षा कमी झाले तर मुले आजारांना बळी पडू शकतात. चला तर मुलांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची सामान्य पातळी किती असावी ते जाणून घेऊया.

मुलांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य पातळी किती असावी?

3 ते 6 महिन्यांच्या बाळामध्ये हिमोग्लोबिनची सामान्य पातळी 9.5 ते 14.1(g/dL) दरम्यान असावी.

6 ते 12 महिन्यांच्या मुलामध्ये हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी 11.3 ते 14.1(g/dL) दरम्यान असते.

1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी 10.9 ते 15.0 (g/dL) दरम्यान असावी.

5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य श्रेणी 11.9 ते 15.0 (g/dL) दरम्यान असते.

तर 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी मुलींमध्ये 11.9 ते 15.0 (g/dL) आणि मुलांमध्ये 12.7 ते 17.7 (g/dL) असावी.

Hemoglobin Level In Children
Hemoglobin Low : हिमोग्लोबिनची कमतरता आहे? गोळ्या खाऊ नका तर हे घरगुती खाद्यपदार्थ खा

मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास दिसतात ही लक्षणे

स्वभावात चिडचिडेपणा.

धाप लागणे.

भूक न लागणे.

सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.

डोकेदुखी आणि चक्कर येणे.

कमकुवत नखे.

त्वचेत पिवळसरपणा.

Hemoglobin Level In Children
Hemoglobin वाढवण्यासाठी घरीच बनवा ही चटपटीत रेसिपी, नोट करा बनवण्याची पद्धत

मुलांमधील हिमोग्लोबिनची कमतरता कशी भरून काढाल?

मुलाच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याला डाळिंब खायला द्या. प्रथिने, कार्ब्स, फॅट, फायबर, लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म डाळिंबात आढळतात. डाळिंब हे मुलांसाठी सुपरफूडचे काम करते. तेव्हा मुलांना आवर्जून डाळिंब खायला द्या.

मुलांना मनुके खायला द्या. मनुक्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. याचे सेवन केल्याने रक्त वाढते. (Health)

अर्धा कप उकडलेल्या पालकमध्ये सुमारे 3.2 मिलीग्राम लोह असते. मुलाचे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालक सूप बनवा आणि त्याला प्यायला द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com