Balanced Diet: तुम्ही संतुलित आहार घेता का? काय खावं नाश्ता आणि जेवणाला? हे वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balanced Diet

Balanced Diet: तुम्ही संतुलित आहार घेता का? काय खावं नाश्ता आणि जेवणाला? हे वाचाच

संतुलित आहार म्हणजे सकस आहार, शरिराला पोषक आहार. यामध्ये प्रोटिन्स, व्हिटामिन्स तसेच शरिराला गरजेचे असलेले पाणी आणि उर्जा याचाही समावेश असतो. खरंच तुम्ही संतुलित आहार घेता का? आणि संतुलित आहार घेताना नाश्ता आणि जेवणात काय खावं? या विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला एका प्रौढ व्यक्तीचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण कसं असावं, या विषयी सांगणार आहोत.

नाश्ता

 • दूध- १०० मि.ली. अर्धा कप/चहा / कॉफी

 • इडली/दोसा / उपमा / ब्रेड चार स्लाईस / कॉर्नफ्लेक्स दुधासोबत

  (नाश्त्यामध्ये वरीलपैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही खाऊ शकता)

हेही वाचा: Balance The Diet: गोड, कडू, तुरट या चवी उन्हाळ्यातील आहारात का महत्वाच्या?

दुपारचं जेवण

 • भात- दोन वाटी

 • दोन फुलके

 • अर्धा वाटी डाळ

 • आवडीप्रमाणे भाजी

 • सलाद - ७-८ स्लाईस

 • दही अर्धा वाटी

हेही वाचा: Health: ओठांवरचा काळेपणा घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!

दुपारचं खाणं(4 वाजताच्या सुमारास)

एक कप चहा

पोहे/ २ स्लाईस टोस्ट/ २ समोसा / २ सँडविच / ५ बिस्किटं (कोणताही एक पदार्थ)

रात्रीचं जेवण

 • २ वाटी भात

 • २ फुलके

 • डाळ

 • भाजी

 • अर्धा वाटी रायता

 • १ फळ