
How to recover from heartbreak-related heart conditions: हार्टब्रेक झाल्यास वेदना होतात, असं अनेक लोकांच्या तोंडीतून तुम्ही एकले असेलच. पण खरंच हृदय तुटू शकतं का? वैद्यकीय भाषेत टाकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी म्हणून ओळखले जाणारे, ब्रोकन हार्ट सिंड्रोम हा एक हृदयरोग आहे. जो अत्यंत भावनिक किंवा शारीरिक ताणामुळे उद्भवते. त्याच्या समान लक्षणांमुळे हृदयविकाराचा झटका म्हणून अनेकदा चुकीचे निदान केले जाते, ही स्थिती प्रामुख्याने हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलवर परिणाम करते, ज्यामुळे हृदयाच्या स्नायू अचानक कमकुवत होतात. ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती ही सविस्तरपणे जाणून घेऊया.