Coronary Artery Disease Myths Vs. Facts: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

What Is Coronary Artery Bypass Grafting (CABG): हृदयशस्त्रक्रियेबद्दलचे गैरसमज दूर करा आणि CAD वरील सत्य समजून घ्या!
Coronary Artery Disease: Myths And Facts
Coronary Artery Disease: Myths And Factssakal
Updated on

Myths And Facts About Heart Bypass Surgery: आपण अनेकदा ऐकतो की एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. पण यामागचं खरं कारण काय असतं? आणि बायपास म्हणजे काय? चला, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया.

CAD म्हणजे नक्की काय?

कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) म्हणजे आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये चरबीसारख्या घटकांचा साठा होणे. त्यामुळे रक्ताचा प्रवाह अडथळित होतो, आणि हृदय व्यवस्थित काम करू शकत नाही. यामुळे छातीत दुखणे (अ‍ॅन्जायना) किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

कोणाला होऊ शकतो हा आजार?

वय वाढणं, घरात पूर्वी कोणाला हृदयविकार झाला असेल, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं आणि व्यायामाचा अभाव; ही सगळ कारणं CAD वाढवतात.

Coronary Artery Disease: Myths And Facts
Celebrity Weight Loss: ५०० शुगर लेव्हलवरही वाहबिज दोराबजी करत राहिली शूटिंग; शो संपताच घेतला योग-प्राणायामाचा आधार! म्हणाली...

उपचार कोणते?

जर कोणाला हृदयविकार झाला असेल आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येत असेल तर रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दोन मुख्य मार्ग वापरले जातात.

  1. अ‍ॅन्जिओप्लास्टी – छोटा फुगा (balloon) वापरून रक्तवाहिनीतील अडथळा बाजूला केला जातो.

  2. बायपास शस्त्रक्रिया (CABG) – रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातील शिरा किंवा धमनी वापरून एक नवीन रस्ता तयार केला जातो, जेणेकरून रक्त अडथळा टाळून हृदयापर्यंत पोहोचू शकते.

CABG बद्दल सामान्य गैरसमज आणि तथ्य

गैरसमज: प्रत्येक ब्लॉकेजसाठी बायपास करावा लागतो
तथ्य: बायपास आवश्यक आहे का नाही, हे कार्डिओलॉजिस्ट आणि सर्जन मिळून ठरवतात. प्रत्येक ब्लॉकेजसाठी बायपास लागत नाही.

गैरसमज: ही शस्त्रक्रिया फक्त वृद्धांसाठी असते
तथ्य: हल्ली ३५–६० वयोगटातील लोकांनाही CAD होतो. भारतात तर रुग्णांचं वय पश्चिम देशांपेक्षा कमी आहे.

Coronary Artery Disease: Myths And Facts
Office Fatigue: ऑफिसमध्ये सतत थकवा जाणवतोय? ‘या’ दोन गोष्टी देतील त्वरित आराम

गैरसमज: बायपास म्हणजे अतिशय धोकादायक शस्त्रक्रिया
तथ्य: ही शस्त्रक्रिया आता तंत्रज्ञानामुळे खूप सुरक्षित झाली आहे. गुंतागुंत होण्याचा धोका फार कमी आहे.

गैरसमज: शस्त्रक्रिया फार वेदनादायक असते
तथ्य: योग्य औषधोपचार आणि फिजिओथेरपीमुळे वेदना बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात ठेवता येतात.

गैरसमज: एकदा CABG केलं की आजार बरा होतो
तथ्य: ही शस्त्रक्रिया लक्षणं कमी करते, पण आजार पूर्णपणे बरा करत नाही. पुन्हा ब्लॉकेज होण्याची शक्यता असते, विशेषतः व्हेन ग्राफ्ट्समध्ये.

गैरसमज: शस्त्रक्रियेनंतर आयुष्य बदलतं, मर्यादा येतात
तथ्य: बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर काम, प्रवास, हसणं, खेळणं यांसह पूर्वीप्रमाणेच सामान्य आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात.

Coronary Artery Disease: Myths And Facts
Infertility Prevention Tips: वंध्यत्व टाळण्यासाठी हवा समतोल आहार अन् व्यायाम

गैरसमज: CABG केल्यावर आरोग्यविषयक सवयी बदलण्याची गरज नाही
तथ्य: शस्त्रक्रिया हा एक भाग आहे, पण आरोग्य राखण्यासाठी चांगली जीवनशैली जसे की व्यायाम, संतुलित आहार, तणाव कमी करणे, यांची तेवढीच गरज असते.

हृदय आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे त्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. शस्त्रक्रिया असो की औषधोपचार, प्रत्येक टप्प्यावर योग्य माहिती आणि काळजी घेतली, तर आपण पुन्हा एक आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगू शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com