

What Is the Green Whistle
sakal
सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त FIFA चा जोश सुरू आहे. रोनाल्डो, मेस्सी, एमबाप्पेसह इतर खेळाडूंचे चाहते न चुकता सामने पाहत आहेत. मात्र या सगळ्या उत्साहात वेगळ्याच गोष्टीने बऱ्याचजणांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे, एका सामन्या दरम्यान एका खेळाडू गंभीर जखमी झाला असताना मेडिकल टीमने त्याच्यावर उपचार करत असताना त्याच्या हातात एक छोटंसं हिरव्या रंगाचं उपकरण दिसलं. आणि थोड्याच वेळात सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर एकच चर्चा सुरू झाली – हे 'ग्रीन व्हिसल' नेमकं काय आहे? हे इतकं खास का मानलं जातंय आणि मोठ्या स्पर्धांपासून ते आपत्कालीन वैद्यकीय सेवांपर्यंत याचा वापर का केला जातो? जाणून घेऊया.