
Everything to Know About Hypoglycemia
sakal
Expert Tips to Manage and Prevent Hypoglycemia Naturally: बऱ्याचदा बहुतेक जणांना उभं न राहता बसल्या ठिकाणी देखील च्कर येते. हे रक्तातील साखर अचानक कमी झाल्याचे लक्षण असते. या उद्भवणाऱ्या स्थितीला हायपोग्लायसेमिया असे म्हणतात. प्रामुख्याने डायबेटिस असलेल्या रुग्णांना जे नियमित औषधं आणि इन्सुलिन घेतात, त्यांच्यात ही स्थिती वारंवार दिसून येते. पण ज्यांना डायबेटिस नाहीये त्यांना देखील कधी कधी हायपोग्लायसेमिया होतो. यावर वेळीच उपाय नाही केला तर जीवावरही बेतू शकते. पण असं का हे आपण जाणून घेऊया. त्याआधी हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ते जाणून घेऊया.