
थोडक्यात:
‘कांगारू मदर केअर’ म्हणजे प्रसूतीनंतर आई-बाळामधील त्वचा-ते-त्वचा संपर्क, ज्यामुळे बाळाला उब आणि संरक्षण मिळते.
ही पद्धत स्तनपानास प्रोत्साहन देते, बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासाला मदत करते आणि आजारांपासून संरक्षण करते.
अकाली व सामान्य प्रसूतीनंतरही उपयुक्त असलेली ही पद्धत अनेक रुग्णालये प्रसूतिगृहाबाहेर खास कक्षांतून राबवत आहेत.
What is Kangaroo Care And Its Benefits For Newborns: प्रसूतीनंतर आईने आपल्या बाळाला कांगारूप्रमाणे आपल्या छातीजवळ ठेवण्याच्या प्रक्रियेला ‘कांगारू मदर केअर’ म्हणतात. हे नवजात बाळाचे संरक्षण करते व या पद्धतीअंतर्गत आई बाळाला जास्त काळ स्तनपान करू शकते. त्याचवेळी बाळही स्तनपान करण्यास शिकते. यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विकास होण्यास मदत होते व यासोबतच मुलाचे विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होत असल्याने शहरातील रुग्णालये या पद्धतीला स्वीकारताना दिसून येत आहेत.