

What Is Mitchell Marsh’s Groin Injury? Causes, Symptoms and Treatment Explained
sakal
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. कोलंबो येथे सराव करताना झालेल्या दुखापतीनंतर करण्यात आलेल्या तपासणीत त्याच्या अंडकोषामध्ये (Groin) अंतर्गत रक्तस्राव (Internal Bleeding) झाल्याचं आढळलं आहे. ही दुखापत नेहमीसारखी ग्रोईन स्ट्रेन नसून थेट अंडकोषावर बसलेल्या जोरदार फटक्यामुळे झाली आहे ज्याला टेस्टिक्युलर ब्लिडिंग (Testicular Bleeding) म्हणतात. डॉक्टरांनी त्याला सध्या विश्रांती आणि उपचार घेण्याचा सल्ला दिला असून, पूर्ण बरे झाल्यानंतर आणि वैद्यकीय परवानगी मिळाल्यावरच तो पुन्हा मैदानात उतरेल.