

Shamonda Virus France
sakal
WHAT IS SHAMONDA VIRUS AND HOW DOES IT SPREAD: फ्रान्समध्ये शामोंडा या जनावरांमध्ये आढळणाऱ्या व्हायरसचा माणसाला पहिल्यांदाच संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हा व्हायरस प्रामुख्याने गुरांमध्ये आढळतो आणि चावणाऱ्या लहान माश्यांमार्फत पसरतो. फ्रान्समधील साठच्या दशकातील एका पुरुषाचा ऑक्टोबरच्या सुरुवातीला मृत्यू झाला. त्याची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी होती आणि त्याच्यावर गंभीर आजारासाठी उपचार सुरू होते. या घटनेनंतर हा व्हायरस नेमका काय आहे आणि माणसांसाठी किती धोकादायक आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.