
सिगारेट ओढणे आणि हाडे मोडण्याचा संबंध काय ? नवा अभ्यास सांगतोय…
मुंबई : सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच श्वसनाचे आजार आणि फुफ्फुस आणि घशाच्या कर्करोगासह अनेक आजारांसाठी ते निमंत्रण देणारं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडा, लास वेगास (UNLV) मधील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, पुरुष स्त्रियांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढतात. त्यामुळे सिगारेट ओढणाऱ्या प्रत्येकांने ही बातमी वाचावीच...
धूम्रपानामुळे ऑस्टियोपोरोसिस, शरिरातील बारीक हाडं ठिसूळ होणं आणि लवकर मृत्यू येण्याचा धोका वाढत आहे.
अभ्यास पथकाने, गेल्या तीन आठवड्यांत 27 संशोधन प्रकाशनांमध्ये नोंदवलेल्या सुमारे 30,000 हाडांच्या तुटलेल्या प्रकरणांचे निरीक्षण केले. UNLV संशोधकांना असे आढळून आले की धूम्रपानामुळे हाडे मोडण्याचा धोका 37 टक्क्यांनी वाढतो.
याचा सविस्तर अहवाल नुकताच सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यात हिप फ्रॅक्चरच्या पलीकडे जाऊन शरीराच्या इतर भागांवरील जसं ती मनगट, खांदे, हात, पाय आणि मणक्यावरील परिणामांचा उहापोह करण्यात आलाय.
संशोधकांनी मागील अभ्यासातील डेटाचा समावेश केला होता. ज्यामध्ये असे आढळून आले की धूम्रपानामुळे पुरुषांमध्ये मणका आणि हिप फ्रॅक्चरची शक्यता अनुक्रमे 32 टक्के आणि 40 टक्क्यांपर्यंत वाढते.
जुन्या अभ्यासानुसार, हाडे तुटल्यानंतर 21 ते 37 टक्के आजारी धूम्रपान करणार्या पुरुष एका वर्षाच्या आत मरण पावतात.
नेवाडा, लास वेगास विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात किंग वू म्हणाले की, धूम्रपान हे ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चरच्या जोखमीसाठीचा एक प्रमुख घटक आहे. आणि पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त धूम्रपान करतात, ज्यामुळे पुरुषांमध्ये ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. जो पुर्वीपासुन परंपरागतपणे स्त्रियांचा आजार मानला गेलाय.
संशोधकांच्या मते, फ्रॅक्चरच्या जोखमीवर सिगारेटचा परिणाम काय होतो, हे अद्याप पूर्णपणे समजलेलं नाहीये. यावर वू म्हणाले की, धूम्रपानामुळे सांगाड्याच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो कारण सिगारेटमधील रसायने हाडांच्या पेशींवर नकारात्मक परिणाम करतात. तसेच तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी करतात. ज्यामुळे तुमच्या हाडांच्या मजबुतीसाठीचे घटक शरीरातुन कमी कमी होत जातात.
ते पुढे म्हणाले की धूम्रपान हा सर्वसाधारणपणे शारीरिक दुखापतीसाठी जोखमीचा घटक मानला जातो आणि शरीराच्या ऊतींच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेत व्यत्यय आणतो. ज्यामुळे शरीराला जखमा होण्याची शक्यता अधिक असते आणि झालेले फ्रॅक्चर बरे होण्यास अधिक वेळ लागतो.
नेवाडा, लास वेगास विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, संशोधकांनी ग्राहकांना धूम्रपान आणि ऑस्टियोपोरोटिक फ्रॅक्चर यांच्यातील संबंधांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. जे वृद्ध लोकांसाठी अपंगत्व आणि अकाली मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहेत.
संशोधकांनी लिहिले की, सिगारेट ओढणे हे युनायटेड स्टेट्समध्ये रोग, अपंगत्व आणि मृत्यूचे एकमेव सर्वांत मोठे कारण आहे. तुम्ही जर सिगारेट ओढणे बंद केले, तर (विशेषतः पुरुषांमध्ये) फ्रॅक्चरचा धोका कमी होईल.
Web Title: Whats The Relation Of Smoking And Breaking Bones New Study
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..