
प्रश्न १ : माझ्या पायावर छोटे छोटे काळे डाग बरेच दिवस येत आहेत. त्वचारोगतज्ज्ञांना दाखवले, पण फरक पडला नाही. हा त्रास रक्ताभिसरणात असलेल्या दोषामुळे येत आहे, असे नंतर एका डॉक्टरांनी सांगितले. डाग वाढत चालले आहेत, यासाठी काय उपचार करता येईल, ते कृपया सुचवावे.
.. अभिषेक बेंद्रे, मुंबई
उत्तर : अशा प्रकारचे काळे छोटे डाग रक्ताभिसरणाच्या त्रासामुळे बऱ्याच जणांमध्ये येताना दिसतात. ते सुधारण्यासाठी नियमित अभ्यंग करणे फायदेशीर ठरते. रोज रात्री झोपताना संतुलन अभ्यंग (सेसमी) तेलासारखे सिद्ध तेल पायावर खालून वर या दिशेने जिरवावे. जमत असेल तेव्हा पाय वर करून बसण्याचा फायदा मिळू शकतो. तसेच संतुलन रुधिरा किंवा सॅन रोझ घेण्याचा फायदा होऊ शकेल. नाडीपरीक्षण करून घेऊन तसेच वयाप्रमाणे सुहृदप्राश घेण्याची गरज आहे का ह बघता येऊ शकेल. पंचकर्म केल्यावर अशा प्रकारचे डाग पूर्णपणे जातात असा अनेकांचा अनुभव आहे. आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे का किंवा रक्त पातळ करणारी कुठली गोळी चालू आहे का हे आपल्या प्रश्र्नावरून कळू शकलेले नाही, पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या बाबतीतही निर्णय घेता येईल.