White Hair Problem : मानसिक अस्वास्थ्यामुळे होतात केस पांढरे, काय सांगतात तज्ज्ञ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

White Hair Problem

White Hair Problem : मानसिक अस्वास्थ्यामुळे होतात केस पांढरे, काय सांगतात तज्ज्ञ

Grey Hair In Young Age : आजकाल प्रत्येकच जण केसांच्या समस्यांनी त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे. काही काळापूर्वी पांढरे केस हे वय झाल्याचं लक्षण होतं. पण हल्ली केस पांढरे होण्यासाठी वयाचं बंधन उरलेलं नाही. आणि तज्ज्ञ याचं कारण मानसिक स्वास्थ्य नसणे असं सांगतात.

लहान वयात केस पांढरे होणे याला प्रीमॅच्युअर ग्रेइंग म्हणजेच अकाली पांढरे होणे असं म्हणतात. याचं कारण पोषक तत्वांची कमी, दीर्घकालीन आजार, याशिवाय अजून अनेक कारणं आहेत. त्यामुळे केस पांढरे होण्याचं नेमकं कारण काय हे वेळीच ओळखणे आवश्यक आहे.

ही असतात कारणं

  • थायरॉइड डिसऑर्डरमुळे लहानमुलं आणि तरुणांमध्ये लवकर केस पांढरे होतात.

  • जेनेटिक डिसऑर्डर किंवा सिंड्रोम

  • पोषणाची कमतरता

  • याशिवाय मानसिक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्याचा कसा होतो केसांवर परिणाम

तज्ज्ञ सांगतात जास्त ताण घेतल्याने केस पांढरे होतात. जर तुम्हाला तुमचा ताण संतुलीत करता आले तर पांढरे झालेले केस परत काळे होऊ शकतात. पण असं प्रत्येकच वेळी होइल असं नाही. पण जर ताण आल्याने केस पांढरे होत असल्याच समजलं तर औषधांची ते वेळीच रोखता येऊ शकतं.

टॅग्स :hairHair CareGray Hair