White Salt : अति मीठ खाऊन आजारपण लावून घेण्यापेक्षा, हा पर्याय आहे उत्तम

कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास पांढरे शुभ्र मीठ वापरल्यामुळे आरोग्याच्या समस्या आणखी वाढतात पांढऱ्या मिठाऐवजी मिठाचीच चव देणारा हा उत्तम पर्याय निवडू शकता
White Salt
White Saltesakal

White Salt : मीठ हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे, मिठाशिवाय आपण जेवणाची कल्पनाच करू शकत नाही. मिठाच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा येतो. उलट्या आणि मळमळ होत असल्यास, जिभेवर एक चिमुट मीठ सोडल्याने आराम मिळतो, परंतु तुम्हाला माहितीये काय कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास पांढरे शुभ्र मीठ वापरल्यामुळे आरोग्याच्या समस्या आणखी वाढतात पांढऱ्या मिठाऐवजी मिठाचीच चव देणारा हा उत्तम पर्याय निवडू शकता.

पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ खा

जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते, तेव्हा आरोग्य तज्ज्ञ जेवणात पांढऱ्या मिठाचा वापर कमी करण्याचा सल्ला देतात, परंतु त्यामुळे जेवणाच्या चवीवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही काळे मीठ वापरू शकता. यामुळे जेवणाची चवही बिघडणार नाही आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रित राहील. चला जाणून घेऊया काळे मीठ खाण्याचे फायदे.

काळे मीठ खाण्याचे जबरदस्त फायदे

1. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होईल

जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असेल तर सामान्य मिठाऐवजी काळे मीठ वापरा, ते रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत राहते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ लागते आणि उच्च रक्तदाबावरही परिणाम होतो.

White Salt
High Cholesterol Remedies :हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी ताबडतोब करावे हे 3 उपाय, कोलेस्ट्रॉल क्षणात विरघळणार!

2. अतिरिक्त वजन वाढणार नाही

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल, तर सर्वप्रथम अन्नातून पांढरे मीठ काढून टाका, त्याऐवजी काळे मीठ खा, कारण असे केल्याने पोटाची चरबी कमी होऊ लागते.

White Salt
High Cholesterol Remedies :हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी ताबडतोब करावे हे 3 उपाय, कोलेस्ट्रॉल क्षणात विरघळणार!

3. उलट्या आणि बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळेल

वारंवार उलट्या झाल्यास तुम्ही काळे मीठ खा, यामुळे लगेच आराम मिळेल. यासोबत हे मीठ खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com