Why Brushing Teeth Before Breakfast is Important
sakal
Oral Hygiene Tips:आपल्या शरीराचे संपूर्ण आरोग्य हे तोंडाच्या आरोग्यावर अवलंबून आहे. तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दात घासणं आवश्यक आहे हे तुम्हाला माहीतच आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी, अशा दोन वेळा दात घासणं गरजेचं आहे. योग्य प्रकारे फ्लॉसिंग करणं आणि नियमित दातांचं तपासणी करणं देखील महत्त्वाचं आहे.
पण इतकं करूनही दात स्वछ राहत नाहीत किंवा त्यांचं आरोग्य नीट जपलं जात नाही, कारण दात कधी घसायचे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तसेच तुम्ही दात घासण्याचं रुटीन ठरवलं तर तोंड स्वच आणि निरोगी राहतं. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की सकाळी उठल्यावर दात नाश्ता करण्याआधी घासले पाहिजेत की नंतर? चला तर मग जाणून घेऊयात.