

sakal
बऱ्याचदा निरोगी राहण्यासाठी किंवा शेपमध्ये राहण्यासाठी किंवा काही आरोग्याच्या समस्यांमुळे बरेचजण वजन कमी करतात. आणि वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रामुख्याने जेवण कमी करतात, क्रॅश डायेट करतात किंवा फक्त वजनकाट्यावर दिसणाऱ्या आकड्यावर लक्ष केंद्रित करतात. मात्र, असं करताना फक्त शरीरातली चरबीच कमी होणं नाही, तर अजूनही बदल होतात, ज्यामुळे वजन कमी झालं तरी शरीर कमकुवत होण्याचा धोका वाढतो. यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे स्नायू (Muscle) कमी होणं.