
Why doctors check eyes during diagnosis
Sakal
Health problems visible in eyes: सर्दी, खोकला, पोटदुखी, अस्वस्थता; आपण थोडं जरी अस्वस्थ असलो तरी डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातो. डॉक्टर सुरुवातीला काही प्राथमिक तपासण्या करतात जसे नाडीचे ठोके, जीभेचा रंग, हृदयाचे ठोके आणि डोळ्यांची तपासणी. पण तुम्हाला कधी विचार आला आहे का, की डॉक्टर कोणत्याही आजारासाठी डोळ्यांची तपासणी का करतात? यामागे काही कारणं आहेत, त्याबद्दल डॉक्टर काय सांगतात ते जाणून घेऊया.
रेडीमियो येथील हेल्थ सिस्टीमच्या प्रमुख अनुषा पुरषोत्तम यांनी नवभारत टाइम्सला सांगतिले की, नियमित डोळ्यांची तपासणी केल्यास फक्त डोळ्यांचे आजारच नाही तर इतर आजारांची माहिती मिळण्यासही मदत होते. डोळ्यांमध्ये अनेक आजारांचे संकेत लपलेले असतात.