

Importance of Fiber in Weight Loss
sakal
वजन कमी करण्यासाठी अनेक जण कडक डाएट आणि तासन्तास व्यायाम करतात, मात्र दीर्घकाळ टिकणाऱ्या वजन नियंत्रणासाठी सहज पाळता येईल असा आहार महत्त्वाचा आहे. आहारात फायबरचं प्रमाण वाढवणं हा त्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकतो, कारण फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास आणि पचनसंस्थेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. AIIMS, Harvard आणि Stanford येथे प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम Instagram पोस्टमध्ये फायबरचं प्रमाण वाढवून, कडक डाएट न करता जवळपास 13.6 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं आहे.