Why We Should Not Give Tea to Kids Doctors Warn About Side Effects
sakal
Why Tea is Harmful for Young Children: "आम्ही मुलांना दुधात थोडासाच चहा मिक्स करून देतो." हे बहुदा बऱ्याच जणांनी ऐकलं किंवा प्रत्यक्ष पाहिलंही असेल. आणि आता थंडी सुद्धा वाढली आहे त्यामुळे थोडास चहा दिला तरी लहान मुलांना थोडासा चहा दिला तरी चालतो असं अनेकांना वाटतं. पण हे लहान मुलांसाठी धोकादायक असू शकतं असं डॉक्टर सांगतात.
चहा प्यायल्यामुळे लहान मुलांच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच चहामध्ये असणारे कॅफिन, टॅनिन्स आणि ऑक्सलेट्स हे घटक मुलांच्या शरीरात आवश्यक असलेल्या खनिजांचे शोषण रोखतात. म्हणून १२ वर्षांच्या खालील मुलांन चहा दिला तर त्यांच्या वाढ होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतात असं डॉक्टरांचं सांगतात. मात्र चहा पिण्याचे लहान मुलांच्या शरीरावर याव्यतिरिक्त इतरही परिणाम होतात, ते देखील जाणून घेऊया.