यांना असतो Vitamin D deficiency चा धोका; हे पदार्थ खायला सुरुवात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VITAMIN D

यांना असतो Vitamin D deficiency चा धोका; हे पदार्थ खायला सुरुवात करा

मुंबई : ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेला Hypovitaminosis D आणि Low Vitamin D म्हणतात. ड जीवनसत्त्व सूर्यापासून मिळत असल्याने त्याला sunshine vitamin असेही म्हणतात. vitamin d deficiency त्वचेच्या रंगामुळेही होते.

हेही वाचा: ‘ड’ जीवनसत्त्व मोजणे झाले सोपे

त्वचेचा रंग गडद असल्यास सूर्याच्या तीव्र किरणांची गरज असते. फिकट रंगाच्या त्वचेपेक्षा गडद रंगाची त्वचा ड जीवनसत्त्व कमी शोषून घेते. ७६ टक्के भारतीय ड जीवनसत्त्वाच्या अभावाने ग्रस्त आहेत. यात १८ ते ३० वयोगटातील व्यक्तींचा समावेश होतो. चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यास ड जीवनसत्त्व शोषून घेण्याची क्षमता वाढते

हेही वाचा: ‘ड’ जीवनसत्त्व - निरोगी आयुष्याचा पाया

ड जीवनसत्त्वाची गरज किती असते

 • जन्मापासून १२ महिन्यांपर्यंत - ४०० IU (International Units)

 • १ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी - ६०० IU

 • १८ वर्षांपर्यंत - ६०० IU

 • १९ ते ७० वर्षांपर्यंत - ६०० IU

 • ७१ वर्षांपेक्षा अधिक वय - ८०० IU

 • गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिला - ६००IU

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काय होते ?

 • हाडे कमकुवत होतात

 • हाडांमध्ये वेदना

 • केसगळती

 • ऑस्टियोपोरोसिस

 • रिकेट्स

 • लठ्ठपणा

 • टाइप 2 मधुमेह मेलिटस

 • हृदयरोग

 • संसर्गजन्य रोग

 • स्व - प्रतिरक्षित रोग

 • कर्करोग

 • संधीवात

ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खाल ?

१. चरबीयुक्त मासे

२. पनीर

३. अळंबी

४. अंडे

५. दुग्धजन्य उत्पादने

६. अन्नधान्य

७. संत्र्याचा रस

८. सोया ज्यूस

कोणामध्ये असते ड जीवनसत्त्वाच अभाव

कृष्णवर्णीय, लठ्ठ आणि वृद्ध लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाचा अभाव आढळतो. मूत्रपिंडाचे आणि हृदयाचे आजार असणाऱ्यांमध्येही ड जीवनसत्त्वाचा अभाव दिसून येतो.

Web Title: Why Human Body Needs D Vitamin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :D Vitamins