पावसाळ्यात चालताना सांधे 'कट-कट' करतात? वेदना वाढण्यापूर्वी करा 'हे' प्रभावी उपाय...

Joint Pain in Monsoon?: पावसाळा आल्हाददायक की वेदनादायी? पावसाळ्यात वाढणाऱ्या 'वाता'वर उपचार करणे महत्वाचे ठरते.सांध्यांची काळजी घेण्याची ही योग्य वेळ असते!
Remedies for Monsoon Joint Pain

Remedies for Monsoon Joint Pain

esakal 

Updated on

Monsoon Health Alert: कडक उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा मनाला आल्हाददायक वाटत असला, तरी अनेक लोकांसाठी हा ऋतू मोठ्या वेदना घेऊन येतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सांधेदुखी किंवा संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांना पावसाळ्यात असह्य वेदना आणि सांधे आखडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. काही रुग्णांना तर चालताना किंवा उठताना पायातून 'कट-कट' असा आवाज येण्याची तक्रारही जाणवते. आकडेवारीनुसार, भारतात जवळपास १५% म्हणजेच सुमारे १८० दशलक्ष (१८ कोटी) लोक या समस्येने ग्रस्त आहेत. हवामानातील बदलांमुळे सांधेदुखी का वाढते, 'आर्थरायटिस' नेमका काय आहे आणि यावर घरातल्या घरात कोणते सोपे उपाय करता येतील, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

आर्थरायटिस म्हणजे काय? (What is Arthritis?)

सांधेदुखी किंवा सांध्यांना सूज येणे याला वैद्यकीय भाषेत 'आर्थरायटिस' (Arthritis) आणि सामान्य भाषेत 'संधिवात' असे म्हटले जाते.

  • शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणे, तिथे तीव्र वेदना होणे आणि सांधे आखडणे म्हणजेच संधिवात होय.

  • यामध्ये सांधे (Joints), सांध्यांच्या आसपास असणाऱ्या पेशी (Tissues) आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होते.

  • हा प्रामुख्याने वाढतं वय आणि शरीराची झीज झाल्यामुळे वृद्धांमध्ये होणारा आजार मानला जातो. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आता लहान मुले आणि युवकांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com