Umbilical Cord : बाळाचा जन्म झाल्यावर त्याची नाळ का जपून ठेवावी? काय आहे यामागे कारण

नाळ जपून ठेवल्याचे काय फायदे आहेत?
Umbilical Cord
Umbilical Cord sakal

Umbilical Cord : पूर्वी बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची नाळ जपून ठेवली जायची. आजही ही बाळाची नाळ जपून ठेवावी, असे सांगितले जाते. तुम्हाला यामागील कारण माहिती आहे का? तुम्हाला आश्चर्च वाटेल की बाळाच्या जन्मानंतर त्याची नाळ ही बिनकामी समजली जाणारी किती उपयोगी आहे.

आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत आणि त्याचे फायदेही जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Should you keep your baby's umbilical cord ? read reason)

खुप कमी लोकांना माहिती असेल की बाळाची नाळ ही 130 हून अधिक गंभीर आजारांवर रामबाण उपाय करणारी ठरू शकते. भविष्यात होणा-या आजारापासून त्या बाळाचाही बचाव केला जाऊ शकतो.

सोबतच कुटुंबातील कोणालाही होणा-या आजारापासून सुटका होऊ शकते. त्यात कॅन्सर, ल्युकेमिया, थॅलेसीमिया, मधुमेह आणि लिव्हर सोरायसिससारख्या आजारांचाही समावेश आहे.

Umbilical Cord
Baby Care : मुलांच्या हेल्दी स्लीपिंग पॅटर्नसाठी फॉलो करा या टिप्स

नाळेमध्ये स्टेम पेशी (stem cells) असतात. स्टेम पेशी पासून शरीरातील विविध प्रकारच्या पेशी तयार करण्याची क्षमता असते. याचा उपयोग अर्थातच विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

Umbilical Cord
Baby Care : मुलांच्या हेल्दी स्लीपिंग पॅटर्नसाठी फॉलो करा या टिप्स

दिल्ली, मुंबई, बँगलोरमध्ये बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नाळेचे जतन करणा-या बँक उघडल्या आहेत. त्यांना गर्भनाळ स्टेम कोशिका बँकिंग म्हटले जाते. यात बेबीसेल ही भारतातील मुख्य गर्भनाळ बँक आहे. महिन्याकाठी देशभरातील 100 जोडपे या ठिकाणी बाळाची स्टेम सेल जतन करतात.

स्टेम सेल ग्लोबल फाऊंडेशनच्या मते भारतात या बँकिंगचा व्यवसाय दीडशे कोटींच्या आसपास आहे. त्यात दरवर्षी 35 टक्क्यांची वाढ होत आहे. बाळाच्या जन्मानंतर गर्भनाळ कापली जाते आणि त्यातून काढलेले रक्त बँकेत पाठविले जाते. शून्य ते 196 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानावर ते नायट्रोजन फ्रीज केले जाते. या प्रक्रियेद्वारे चक्क 600 वर्षांपर्यंत हे रक्त जतन केले जाऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com