
Egg Freezing Demand on the Rise
sakal
Understanding Egg Freezing: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात अनेक महिला करिअर, शिक्षण, आरोग्य किंवा वैयक्तिक कारणांमुळे मातृत्वाचा निर्णय पुढे ढकलत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘स्त्रीबीज गोठवणे’ (एग फ्रीजिंग) ही वैद्यकीय सुविधा महिलांसाठी एक महत्त्वाचा पर्याय बनू लागला आहे. उशिरा लग्न होणे, गर्भधारणेतील अडचणी, कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर चालू असलेले उपचार किंवा केवळ भविष्यातील नियोजन म्हणून अनेक महिला ही प्रक्रिया निवडत आहेत. त्यामुळे मातृत्वाचा निर्णय आपल्या वेळेनुसार घेण्याचे स्वातंत्र्य व सुरक्षितता या माध्यमातून महिलांना मिळू लागली आहे.