
Heart Attack : पुरुषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅकचा धोका कमी का असतो?
Heart Attack : गेल्या तीन चार वर्षात हार्ट अटॅकचं प्रमाण देशात वाढलेलं दिसत आहे. याला बदलती लाईफस्टाईल, अयोग्य आहार, चुकीच्या सवयी असे अनेक कारणे दिली जातात पण तुम्ही कधी अनुभवलं का की सहसा पुरुषच हार्ट अटॅक ला बळी पडतात.
स्त्रियांनाही हार्ट अटॅक येतो मात्र फार क्वचितच स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. असं का? पुरुषांपेक्षा स्त्रियांना हार्ट अटॅकचा धोका कमी का असतो? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. ( Why women have less risk of heart attack than men read reasons )
असं म्हणतात की पुरुषांच्या तुलनेत महिलांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप कमी असते. पण हे खरं नाही मात्र पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हार्टचे आजार दहा वर्षानंतर दिसून येतात. त्यामुळे म्हातारपणात किंवा उतरत्या वयात स्त्रियांमध्ये हार्टचे आजार दिसून येतात.
पुरुषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅकचा धोका कमी का असतो?
पुरुषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅकचा धोका कमी असतो. यामागे अनेक कारणे आहेत. महिला पुरुषांपेक्षा जास्त शारिरीक मेहनत घेतात. त्यामुळे त्या शारिरीकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग असतात.त्यामुळे त्यांना लवकर हार्टच्या आजारांचा सामना करावा लागत नाही.
याशिवाय आणखी एक मुख्य कारण म्हणजे मासिक पाळी दरम्यान त्याचं एस्ट्रोजन हार्मोनचं स्राव होतं. हे हार्मोन कमी कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊ देतं.
हार्ट अटॅकची लक्षणे
हार्ट अटॅक येण्याआधी डावा हात आणि पाठदुखीचा त्रास जाणवतो.
याशिवाय छाती सतत दुखते
श्वास घ्यायला त्रास होतो.
लवकर थकवा जाणवतो.
मात्र हे लक्षात घ्यायला हवं की कधी कधी अति काम झाल्याने किंवा पुरेशी झोप न झाल्यानेही हातपाय आणि पाठीदुखीचा त्रास जाणवतो.
त्यामुळे घाबरुन न जाता डॉक्टरांकडे जावे.