Heart Attack : हिवाळ्यात अंघोळ करताना 'ही' चूक करू नका नाहीतर येऊ शकतो हार्ट अटॅक

हिवाळ्यात अंघोळ करताना कोणती चूक करू नये, आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.
Heart Attack
Heart Attacksakal

Heart Attack : हार्ट अटॅक अशी गोष्ट आहे जो अचानक येतो आणि वेळीच उपचार मिळाले नाही तर जीवही जाऊ शकतो. हल्ली हिवाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक वाढले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का अंघोळ करताना जर तुम्ही जर एक चुक केली तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

होय, हे खरंय. हिवाळ्यात अंघोळ करताना कोणती चूक करू नये, आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. (never do this mistake while bathing in winter causes Heart Attack : healthy lifestyle )

हिवाळ्यात अंघोळ करणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही कारण अंघोळ करताना झालेली एक चुक तुमच्या जीवावर बेतू शकते. काही लोकांना हिवाळ्यातही थंड पाण्याने अंघोळ करायची सवय असते जे चुकीचं आहे तर काही लोकांना हिवाळ्यात कडक गरम पाण्याने अंघोळ करायची सवय असते, हे सुद्धा हार्टसाठी धोकादायक असू शकतं.

Heart Attack
Stroke-Heart Attack Risk in Winter: थंडीत बाथरूममध्येच जास्त हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या कारण

कोमट पाण्याने अंघोळ करावी

हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करणे अधिक फायदेशीर असतं. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही आणि शरीराचं तापमान स्थिर राहतं. खरं तर कोमट पानी शरीराचं तापमान वाढवतं आणि ब्लड सर्कुलेशनला प्रोत्साहीत करतं.

Heart Attack
Heart Attack : अचानक हार्ट अटॅक आला तर फक्त 'या' 3 स्‍टेपनी वाचवा जीव

हिवाळ्यात थंड्या पाण्याने का अंघोळ करू नये

हिवाळ्यात जेव्हा आपण थंड्या पाण्याने अंघोळ करतो तेव्हा शरीरावर काटे येतात. आपलं शरीर असं रिअॅक्ट करतं जसे की काहीतरी इमर्जंसी आहे आणि ब्लड सर्कुलेशन सुद्धा वाढतं आणि आपलं हार्टपण तेजीने रक्ताला पंप करायला लागतो. अशात हार्ट ब्लडचं सर्कुलेशन थांबवितो ज्यामुळे आपण थरथरायला लागतो ज्यामुळे आपल्या हार्टवरही अधिक दबाव वाढतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com