

Cold Weather Health Tips
Sakal
How to Stay Healthy in Winter Season : माणसाचे शरीर हे अजब यंत्र आहे. प्रत्येक पेशी नेमून दिलेले काम इमाने इतबारे शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडीत असते. या सर्व पेशींवर मेंदूचे नियंत्रण असते. शरीराचे तापमान टिकविणे, पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे हे कार्य श्वसनसंस्था, मूत्रपिंड आणि त्वचा यांच्यामार्फत हायपोथॅलॅमस (Mucosa) हा मेंदूचा भाग ठरवितो. त्वचा व अंत:त्वचा बाहेरून शरीरात प्रवेश करणाऱ्या सूक्ष्म जिवांना प्रतिकार करतात.
प्रत्येक पेशीला त्यांचे काम व्यवस्थित करता यावे म्हणून योग्य ते अन्न, पाणी व प्राणवायूची गरज असते. ते पेशींना पोहचविण्याचे काम श्वसन व रक्ताभिसरण संस्था करीत असतात. कोठूनही सूक्ष्मजंतू प्रवेश करू लागले तर रक्तातून तेथे पांढऱ्या पेशींचे कमांडोज आणि रासायनिक प्रतिकारतत्त्वे क्षणात पोहचतात. विजय कोणाचा होणार, त्यावर आजार होणार, न होणार हे ठरते.