Winter Health Tips: चहा शिवाय हे तीन पेय देऊ शकतात तुम्हाला सर्दी खोकलापासून मुक्ती

सर्दी, खोकल्यामुळे घसा घवघवतो अशा वेळी मग गरम गरम चहा पिण्याचा सल्ला अनेकजण देऊ लागतात.
Winter Health Tips
Winter Health TipsEsakal

हवामानात बदल झाले की त्याचे परिणाम आपल्या शरीरावर देखील लगेच होऊ लागतात. थंडीची चाहुल लागली की सगळ्याच्या शरीरात असे बदल दिसु लागतात. अचानक झालेल्या या हवामानबदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारखे आजार होणे हे स्वाभाविक लक्षण आहे. जरी हे आजार जास्त काळ टिकणारे नसले तरी या दिवसांत मात्र आपले शरीर पूर्णपणे कोमेजून जाते. थकवा जाणवतो. सर्दी, खोकल्यामुळे घसा घवघवतो अशा वेळी मग गरम गरम चहा पिण्याचा सल्ला अनेकजण देऊ लागतात. कारण सर्दी झाली असेल तर आल्याचा चहा सर्वात जास्त आराम देतो. पण ते वारंवार प्यायल्याने पचनाच्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे आज आपण या लेखात चहा शिवाय इतर कोणते घरघुती पेय आपल्याला सर्दी खोकलापासून मुक्ती देऊ शकतात याची सविस्तर माहिती पाहू या..

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी-खोकला ही समस्या सामान्य आहे. आता बरीच औषधे उपलब्ध असली तरी, घरगुती उपचार हे सर्वोत्तम आहेत. कारण त्यांचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. सर्दी आणि फ्लू बरे करण्यासाठी अनेकदा लोक औषधासोबत आल्याचा चहा घेतात.

हे पेय असे की जे तुमचा आजार लगेच बरे करतील आणि आराम देईल.नेहमीच्या आल्याच्या चहाशिवाय अनेक आयुर्वेदिक पेय आहेत जी सर्दी आणि खोकला पासून मुक्त होण्यास मदत करतात. कारण आजही तुमच्या आमच्या सारखी असंख्य लोक लोक ही सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी घरगुती उपचारांवरच अधिक भर देतात.

1) आले व मधाचे मिश्रित पेय

सर्दी आणि खोकल्या दरम्यान अँटीव्हायरल गुणधर्म असलेले पेय पिणे चांगले. हे पेय बनवायला खूप सोपे आहे. आल्यामध्ये असलेल्या बायोएक्टिव्ह कंपाऊंडमुळे ते सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते. हे फायटोन्यूट्रिएंट्स, जिंजरोल्स आणि शोगोल विषाणूजन्य संसर्गाचा धोका कमी करतात आणि गंभीर सर्दी आणि खोकला टाळण्यास मदत करतातअसे बनवा 

आले व मधाचे  मिश्रित पेय कसे तयार करायचे ?

हे बनवण्यासाठी तुम्हाला 4 चमचे चिरलेले ताजे आले, एका लिंबाचा रस, 2चमचे सेंद्रिय कच्चे मध, 1 कोंब ताजे थाईम, पाणी. सर्व साहित्य तयार करा आणि हे सर्व साहित्य ड्रिंक डिफ्यूझरमध्ये ठेवा. पाणी उकळून पॅनमध्ये घाला. पेय 5 मिनिटे उकळू द्या. तुमचे पेय तयार आहे.

Winter Health Tips
Winter 2022: हिवाळ्यात लवंगाचा चहा का प्यावा?

2) हळदीचे दूध

हळदीचे दूध हे एक पारंपारिक भारतीय पेय आहे जे सर्दी, खोकला आणि इतर जिवाणू संसर्गावर उपचार म्हणून वापरले जाते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतो ज्यामुळे घसा शांत होतो आणि कोणत्याही प्रकारच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच, शरीरातील बॅक्टेरिया काढून टाकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे मधही घालू शकता.

हळदीचे दूध कसे तयार करायचे ?

हळदीचे दूध तयार करण्यासाठी तुम्हाला एक पाव दूध, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा सुंठ, एक चमचा मध, अर्धा चमचा तूप. एका पातेल्यात मध्यम आचेवर दूध उकळण्यासाठी ठेवावे. गॅस मंद करून त्यात हळद, जायफळ, आले, काळी मिरी, तूप घालावे. सर्वकाही नीट मिक्स होईपर्यंत ढवळा आणि गॅस बंद करा. आता त्यात मध घाला आणि लगेच दूध पिऊन घ्यावे.

Winter Health Tips
Vidarbha Special Recipe: गावरान तुरीच्या सोल्याची आमटी कशी तयार करायची?

3) तुळशीचा काढा

सर्दी, खोकला, घसा खवखवल्यावर तुळशीच्या पानांपासून तयार केलेला काढा पिल्याने चुटकीसरशी शारीरिक समस्या दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आणि त्यापासून बनविलेला काढा पिल्याने आपण दीर्घ आयुष्य निरोगी राहू शकता.

तुळशीचा काढा कसा तयार करायचा?

काढा बनवण्यासाठी तुम्हाला मूठभर तुळशीची पाने, एक चमचा हळद, दोन चमचे मध किंवा गूळ आणि पाणी. काढा बनवण्यासाठी एका पातेल्यात 2 कप पाणी घालावे आणि एक उकळी आणा. तुळशीची पाने हाताने हलके मॅश करा आणि उकळत्या पाण्यात टाकावे. हळद घालावी आणि पाण्याचे प्रमाण थोडे कमी होईपर्यंत उकळू द्या. गॅस बंद करा आणि कप मध्ये घाला. प्रत्येक कप मध्ये एक चमचा मध किंवा गूळ घाला, विरघळत नाही तोपर्यंत ढवळा आणि गरम गरम तुळशीचा काढा प्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com