Prevent Risk of Kidney Stone in Winter Drink Sufficient Water
Sakal
Urine Stone Risk in Winter: हिवाळ्यात वाढलेले थंडीचे प्रमाण आणि त्यामुळे कमी प्रमाणात पाणी पिण्याची सवय, तसेच रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने वाढलेला रक्तदाब या गोष्टींमुळे मूत्रपिंडांवर (किडनी) अतिरिक्त ताण येतो. शरीरात सौम्य पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास रक्तातील द्रव कमी होत जाते. अशावेळी मुतखडा (किडनी स्टोन) होण्याची शक्यता वाढत असल्याचे निरीक्षण मूत्रपिंड विकारतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.