Pulmonary Hypertension : पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक असतो या आजाराचा धोका

काही रुग्णांमध्ये फुफ्फुसातील रक्त पंप करण्याचा दाब वाढतो ज्यामुळे पल्मोनरी हायपरटेन्शन नावाची स्थिती निर्माण होते.
Pulmonary Hypertension
Pulmonary Hypertensiongoogle

मुंबई : तुम्हालाही दम लागणे किंवा छातीत दुखणे अशी लक्षणे दिसून येतात का ? हे पल्मोनरी हायपरटेन्शन (PH) मुळे होऊ देखील शकते. ही एक प्रकारची उच्च रक्तदाबाची समस्या आहे जी फुप्फुसात आणि हृदयाच्या उजव्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. ही स्थिती महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

फुप्फुस हा शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे जो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाण घेवाण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसातील रक्त पंप करण्याचा दाब वाढतो ज्यामुळे पल्मोनरी हायपरटेन्शन नावाची स्थिती निर्माण होते.

यामध्ये प्राइमरी पल्मोनरी एचटीएन (पीपीएच) हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामध्ये फुफ्फुसातील अनियंत्रित रक्तदाबामुळे रक्ताभिसरणात अडथळा येतो. या आजाराची लक्षणे आणि उपाय यांविषयी सांगत आहेत ग्लोबल रुग्णालयाचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी. हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Pulmonary Hypertension
High Blood Pressure : ही लक्षणे आहेत धोकादायक; त्वरीत उपचार घ्या

फुप्फुसीय उच्च रक्तदाब प्रामुख्याने प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन प्रकारांमध्ये दिसून येतो. दोन्ही परिस्थितींमध्ये योग्य उपचार करणे आवश्यक आहे. बहुतेक रूग्णांना सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसून येत नाहीत.

फुफ्फुसाचा दाब जास्त वाढल्याने (50 मिमीच्यापेक्षा जास्त) लवकर थकवा येणे, दम लागणे, पायऱ्या चढण्यास त्रास होणे किंवा व्यायाम करताना होणारा त्रास यासारखी सामान्य लक्षणे दिसू लागतात.

सुरुवातीला ही लक्षणे सूक्ष्म पातळीवर दिसून येतात. ठरावीक चाचण्या केल्याशिवाय ती ओळखता येत नाहीत. शेवटच्या टप्प्यातील लक्षणांमध्ये पाय सुजणे, पचनासंबंधी अडचणी येणे, रक्तदाब कमी होणे आणि सरळ झोपता न येणे येणे आदींचा समावेश आहे.

फुफ्फुसीय उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास असणे, लठ्ठपणा, विशिष्ट औषधांचे सेवन आणि जन्मजात हृदयविकारामुळे ही स्थिती उद्भवू शकते.

ही स्थिती पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते कारण फुफ्फुसीय उच्च रक्तदाब स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे आणि 15 ते 20 वर्षे तरुण वयोगटात आणि गर्भधारणेदरम्यान देखील ही समस्या उद्भवू शकते. ल्युपस आणि संधिवात सारखे स्वयंप्रतिकार विकार देखील स्त्रियांमध्ये सामान्य आहेत आणि हे या स्थितीला आमंत्रण देऊ शकतात.

Pulmonary Hypertension
गर्भारपणातील उच्च रक्तदाबावर उपाय काय ? अशी घ्या काळजी...

फुप्फुसीय उच्च रक्तदाबाची मुख्य समस्या म्हणजे हृदयाच्या उजवे वेंट्रिकल निकामी होण्यास सुरुवात होते. रुग्ण निळा पडून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये फक्त हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असू शकतो.

काही रुग्णांचे गर्भधारणेदरम्यान निदान होते. आई आणि गर्भ या दोघांचेही व्यवस्थापन करणे कठीण असते. संपूर्ण क्लिनिकल तपासणी, ईसीजी, एक्स-रे आणि 2 डी इको या स्थितीचे परीक्षण आणि निदान करण्यासाठी फायदेशीर ठरते.

हृदय-फुप्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रूग्णांमध्ये ईसीएमओ किंवा वेंट्रिक्युलर असिस्ट उपकरणांसारख्या विविध नवीन थेरपी देखील वापरल्या जाऊ शकतात. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही ओव्हर-द-काउंटर औषधांचे सेवन टाळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com