प्रश्र्न १ - माझे वय ३५ वर्षे आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी मी गर्भसंस्कार पुस्तकातील सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन केले आणि त्याचा मला चांगला फायदा झाला आहे. दोन्ही वेळा मला फेमिसॅन तेलाच्या पिचूचा खूप फायदा झालेला जाणवला. थोड्या दिवसांपूर्वी मी पुन्हा पिचू ठेवायला सुरुवात केली, पण पिचू ठेवल्यावर मला तिथली जागा लाल झाल्यासारखी वाटते, थोडी खाज येते व जळजळ जाणवते. असा त्रास का होत असावा आणि यावर मला काय उपाय करता येईल, हे सुचवावे.
- सौ. मुक्ता, पुणे
उत्तर - स्त्रीच्या स्वास्थ्य व संतुलनासाठी योनीपिचू हा एक उत्तम उपचार आयुर्वेदात सांगितलेला आहे. योनीभागी पिचू ठेवल्यावर खाज येणे, जळजळ होणे वा त्वचा लाल होणे ही लक्षणे ती जागा संवेदनशील झाल्याचे निदर्शक आहे. शरीरातील अतिरिक्त उष्णता किंवा त्या जागी जंतुसंसर्ग झालेला असणे हे कारण असू शकते. लघवी साफ होण्यासाठी रोज पाणी व्यवस्थित प्रमाणात प्यावे.
शक्य झाल्यास सकाळी जिरे व धण्याचे पाणी पिण्याचा फायदा मिळू शकेल. जिरे व धण्याचे पाणी कसे करावे हे जाणून घेण्याकरिता डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर हीलिंग वॉटर हा व्हिडिओ नक्की बघावा, तसेच बरोबरीने संतुलन पित्तशांती गोळ्या, संतुलन पुनर्नवासव, संतुलन प्रशांत चूर्ण वगैरे घेण्याचा फायदा होऊ शकेल.
रोज पिचू वापरत असताना फेमिसॅन तेलात संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल मिसळता येईल किंवा बाजारातून आणलेले नैसर्गिक खोबरेल तेल फेमिसॅन तेलात मिसळून पिचू काही दिवस ठेवावा म्हणजे अशा प्रकारचा त्रास कमी होऊ शकेल. खूप प्रमाणात पांढरे पाणी जात असेल किंवा लघवीला इतर काही त्रास होत असला तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन नंतरच उपचार करावेत.