Health Care News: तुम्हीही रोज शेपवेअर वापरताय? होऊ शकतात हे गंभीर परिणाम, जाणून घ्या

अनेक महिलांना हे माहीत नसते की रोज शेपवेअर परिधान केल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.
shapewears
shapewears sakal

भारतीयांपासून वेस्टर्नपर्यंत प्रत्येक मुलीला प्रत्येक पोशाखात परफेक्ट दिसावे असे वाटते. मात्र, बहुतांश महिलांसाठी हे स्वप्न केवळ स्वप्नच राहते आणि हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजारात नवीन वस्तूचा शोध लागला आहे, ज्याला शेपवेअर म्हणतात.

हे शेपवेअर शरीरातील नको असलेली चरबी लपवण्यासाठी आणि तुमच्या आवडत्या ड्रेसमध्ये बसवण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

फार कमी वेळात या शेपवेअर्सनी लोकांमध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर हे शेपवेअर शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारात, आकारात आणि रंगांमध्ये उपलब्ध आहेत, जे तुमच्या आवडीनुसार खरेदी करता येतील.

कोणत्याही पार्टी किंवा विशेष प्रसंगी या शेपवेअरच्या मदतीने, स्त्रिया त्यांचा आवडता पोशाख परिधान करून स्वत: मध्ये आत्मविश्वास अनुभवतात आणि स्वत: ला फ्लॉन्ट करतात.

shapewears
Health Care News: पडल्यामुळे पाठीला दुखापत झाली आहे? मग या गोष्टी केल्याने लगेच मिळेल आराम

पण काही लोकांमध्ये ते रोज घालण्याची सवय दिसते. ऑफिसला जाणार्‍या स्त्रिया असोत किंवा कॉलेजला जाणार्‍या मुली असोत, त्यांपैकी काही ते रोज घालतात. आज आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की दररोज शेपवेअर घालणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे की नाही.

दररोज शेपवेअर घालणे ही हेल्दी हॅबिट आहे ?

ज्या महिलांना सडपातळ आणि तंदुरुस्त दिसायचे आहे ते दररोज शेपवेअर घालतात. दररोज शेपवेअर जास्त काळ घालणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. इतकेच नाही तर यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर ताण येतो, त्यामुळे पचनाच्या समस्याही वाढू शकतात.

श्वास घेण्यास आणि रक्ताभिसरणातही अडचण येऊ शकते. जास्त काळ शेपवेअर कॅरी केल्याने अस्वस्थता वाढते ज्यामुळे वेदना होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com