Hormonal Imbalance in Women | Expert Warning on Abnormal Body Changes
sakal
आरोग्य
Hormonal Imbalance in Women: महिलांमध्ये वाढत आहे हार्मोनल असंतुलन; शरीरातील असामान्य बदलांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा इशारा
Hormonal Imbalance in Women on the Rise: महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन वाढत असून, शरीरातील असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे – तज्ज्ञांचा इशारा.
Women Facing Increasing Hormonal Imbalance: हल्लीच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि भावनिक कारणांमुळे शरीरातील हार्मोन्सच्या स्रावात असमतोल झाल्याची समस्या महिलावर्गात आढळून येते. अनेक महिला शरीरात होणाऱ्या असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करतात, जसे की थकवा, अनियमित मासिक पाळी किंवा मूड स्विंग्ज त्यांना हेच माहित नसते की या समस्या हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवतात.
महिलांनी इस्ट्रोजेन, अँटी-मुलेरियन हार्मोन (एएमएच), थायरॉईड हार्मोन्स आणि प्रोलॅक्टिन सारख्या या प्रमुख हार्मोन्सच्या पातळीचे निरीक्षण करणे आणि असामान्य लक्षणं आढळताच वेळीच मदत घेणे गरजेचे आहे. जर हार्मोनशी संबंधित प्रजननक्षमतेच्या कोणत्याही समस्या आढळून आल्या तर त्वरीत प्रजनन तज्ञाचा सल्ला घ्यावा.

