Almost Lakhs of Checkups Showed The Severity of Women's Health Crisis In Maharashtra
sakal
Women’s Health Crisis in Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील महिलांचे आरोग्य गंभीर धोक्यात असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या अभियानांतर्गत केलेल्या तपासणीतून अॅनिमिया (रक्तक्षय), उच्च रक्तदाब (हायपरटेंशन) आणि मधुमेह (डायबिटीज) यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचे प्रमाण भयावह पातळीवर पोहोचले आहे. अॅनिमियाची सर्वाधिक प्रकरणे चंद्रपूर, पुणे, नागपूर, बुलढाणा, अकोला, नांदेड, परभणी आणि नंदुरबार जिल्ह्यांत आढळली आहेत.