

The Hidden Habit Behind Women’s Weight Gain
sakal
वजन हे वाढण्यासाठीच असतं, असं म्हणावं इतकं एकेकीचं वजन वाढत जातं. कधी बाळंतपणाचं निमित्त असतं तर कधी व्यायामाला वेळ नसल्याचं. वजन वाढण्यापाठोपाठ सुरू होतात शारीरिक तक्रारी. अनेक रोगांचं मूळ असलेल्या स्थूलतेला वेळीच आवरलं तर चांगलं आरोग्य पदरी पडतं, हे नक्की.
प्रगत महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. यातून भविष्यातील पिढीचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. राज्यातील 16 टक्के जनतेत "स्थूलता' हा आजार असल्याचा निष्कर्ष भारतीय वैद्यक संशोधन या नियतकालिकांत प्रसिद्ध केला आहे.