Work Life Balance : काम आणि दिनक्रमाचे संतुलन

Work Life Balance and Holistic Living : वर्क लाइफ बॅलन्स म्हणजे केवळ कामाचे तास कमी करणे नव्हे, तर काम, कुटुंब, आरोग्य, नाती, छंद आणि मानसिक शांतता यांचा योग्य समन्वय साधून समाधानी जीवन जगणे होय. प्रत्येकाने स्वतःच्या गरजांनुसार संतुलनाची व्याख्या ठरवावी.
Work Life Balance and Holistic Living

Work Life Balance and Holistic Living

esakal

Updated on: 

वर्क-लाइफ बॅलन्स’ (काम आणि दिनक्रमाचे संतुलन) ही संकल्पना आज आधुनिक जीवनाचा जणू परवलीचा शब्द बनली आहे. काम, कुटुंब, व्यायाम, स्वतःसाठी वेळ, प्रवास आणि विश्रांती यांची योग्य सांगड घातली, की आयुष्य संतुलित होईल, असा समज आहे. मात्र, आयुष्य इतकं सरळसोपं नसतं. मी योग थेरपिस्ट आणि लाइफस्टाइल कोच म्हणून लोकांशी बोलताना एक गोष्ट वारंवार अनुभवते, ते म्हणजे अनेकांना ‘बॅलन्स’ हवा असतो; पण नेमका कशाचा आणि कोणत्या अर्थाने, हे स्पष्ट नसतं. ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ म्हणजे केवळ कामाचे तास कमी करणं नव्हे, तर आपण इच्छित असलेलं आयुष्य जगण्यासाठी आपला वेळ, ऊर्जा आणि एकाग्रता योग्य दिशेनं वापरतो आहोत का, हा खरा विचार करण्याचा मुद्दा आहे.

Loading content, please wait...