World Asthma Day 2023 : अस्थमाच्या त्रासात ही 5 योगासनं करावी, श्वास घेण्याच्या समस्येतून आराम मिळेल

अस्थमा ही श्वसनाशी निगडित अशी समस्या आहे जी लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे
World Asthma Day 2022
World Asthma Day 2022esakal

World Asthma Day 2022 : जगभरात ३ मे हा दिवस जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो. अस्थमा ही श्वसनाशी निगडित अशी समस्या आहे जी लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे यासंबंधित आजारांबाबत जागृकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तेव्हा या आजारात डॉक्टरांच्या औषधासह आणि उपचारांसह तुम्ही ही योगासनंसुद्धा ट्राय करू शकता. त्याने तु्म्हाला श्वास घेण्याच्या त्रासापासून आराम मिळेल.

श्वसन

अस्थमाच्या रूग्णांसाठी हे आसन सगळ्यात फायदेशीर मानले जाते. या आसनामुळे केवळ मानसिक तणाव किंवा चिंताच दूर होत नाही तर या आसनाने डोकंसुद्धा शांत होतं.

सुकासन

सुकासनसुद्धा अस्थमाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर मानल्या जाते. हे आसन करताना संपूर्ण वेळ श्वास घेण्यावर आणि सोडण्यावर लक्ष केंद्रित केल्या जातं. त्यामुळे हे आसन अस्थमाच्या ट्रीटमेंटसाठी फायदेशीर ठरते. तसेच हे आसन फुफ्फुसाच्या आरोग्यासाठीही फार चांगले मानले जाते. (Asthma)

World Asthma Day 2022
Mental Health Problems : मानसिक आरोग्याच्या विळख्यात मेंटली फिट कसं रहायचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

भ्रामरी प्राणायम

हा श्वास घेण्याचा व्यायाम मनशांतीसाठी आणि शरीराला पुनर्जिवंत करण्यासाठी मदत करते. तणाव आणि चिंता दूर करण्यातही हे आजार फार फायदेशीर आहे. (health)

उपविष्ठ कोणासन

उपविष्ठ कोणासनाला इंग्रजीत Seated Wide Angle Pose असंही म्हटलं जातं. या आसनात जमिनीवर हिप्सच्या जोरावर बसून दोन्ही पायांना जमेल तेवढे पसरवा. उपविष्ठ कोणासन करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर ५-६ तासांनी संध्याकाळी. हे आसन 30 ते 60 सेकंद करता येते.

भ्रस्तिका प्राणायम

हे आसन फुफ्फुसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे नैराश्य, चिंता आणि अगदी फायब्रोसिसच्या उपचारांमध्ये मदत करते. याशिवाय, खोकला, फ्लू, श्वसन समस्या, ऍलर्जी किंवा श्वास लागणे यावर उपचार करण्यात मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com