

World Blood Donor Day | Blood Donation Facts
sakal
दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) साजरा केला जातो. अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांमुळे अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते. अशा वेळी एका व्यक्तीचे रक्तदान दुसऱ्याला नवीन आयुष्य देऊ शकते. तरीही आजही अनेक लोक रक्तदान करण्यास घाबरतात.
"रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो", "संसर्ग होऊ शकतो" किंवा "शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत" अशा अनेक गैरसमजांमुळे अनेक निरोगी लोक रक्तदानापासून दूर राहतात. पण हे खर आहे की कोणतं मिथक? जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जाणून घेऊया रक्तदानाबाबतची खरी माहिती आणि सहज पसरणारे समज गैरसमज.