

Changing Lifestyle is Causing Surge of Dibetes Patients in Maharashtra
sakal
Diabetes: देशासह मुंबईत मधुमेही रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहामुळे शरीरातील अन्य अवयवांसह मूत्रपिंडाच्या कार्यावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे बदललेली जीवनशैली घातक ठरत आहे.
भारतात मधुमेहाचे सहा कोटींहून अधिक रुग्ण आहेत, तर मुंबईत २० टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त असून, २० ते ४० वयोगटातील लोकांचाही यात समावेश आहे. एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. राशी अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाची सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे ५० टक्के लोकांना मधुमेह असल्याचे समजत नाही. अनेकदा हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्येनंतर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मधुमेहाचे निदान होते. जागरूकतेचा अभाव, अनियमित तपासणीमुळे ३० ते ६५ वयोगटात हा आजार पसरत आहे.