World Eye Donation Day 2024 : २२२८ लोकांचे नेत्रदान, २४७७ डोळ्यांचे प्रत्यारोपण

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी अंदाजे ८.५ लाख लोकांचा मृत्यू होतो, परंतु त्यातून फक्त २२२८ लोकांचे नेत्रदान झाले.
World Eye Donation Day 2024
World Eye Donation Day 2024Sakal

अमरावती : रक्तदानासोबतच नेत्रदानाचे महत्त्व घरोघरी पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ यादरम्यान २२२८ लोकांचे ४४५६ डोळे दान झाले व त्यापैकी २४७७ डोळ्यांचे प्रत्यारोपण होऊ शकले.

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी अंदाजे ८.५ लाख लोकांचा मृत्यू होतो, परंतु त्यातून फक्त २२२८ लोकांचे नेत्रदान झाले. राज्यात जवळपास ७७ नेत्रपेढी, २४३ नेत्र प्रत्यारोपण केंद्र व ९२ नेत्र संकलन केंद्रे आहेत. बहुतांशी ठिकाणी नेत्रपेढीची कागदोपत्री नोंद आहे, असे सांगण्यात येते. परंतु ते नेत्रदानाचे काम करीत नाहीत. महाराष्ट्र राज्यात फक्त २०-२५ नेत्रपेढी नेत्रदानाचे २४ तास काम करीत आहे.

नेत्रातील दोन बुबुळांमुळे दृष्टीबाधित अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. कोणत्याही वयोगटातील मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नेत्रदान केले जाऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेल्या व्यक्तींचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे सुद्धा नेत्रदान केले जाऊ शकते.

World Eye Donation Day 2024
Eye Protection Tips : कडक उन्हाळ्यात सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

अमरावतीत दिशा ग्रुपच्या दिशा एज्युकेशन फाउंडेशन या धर्मदाय संस्थेद्वारे नेत्रदान कार्य २००५ पासून सुरू आहे. दिशा इंटरनॅशनल आय बँक ही अमरावती जिल्ह्यातील एकमेव धर्मदाय नेत्रपेढी आहे.

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये २९ लोकांचे नेत्रदान म्हणजे ५८ बुबूळ दिशा इंटरनॅशनल आय बँकमध्ये दान करण्यात आले तर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २४ लोकांचे म्हणजे ४८ बुबूळ दान झाले.

जिल्ह्यातून ५६ लोकांचे नेत्रदान वर्षभरात करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयामधील ४८ बुबुळांपैकी २१ बुबुळांचे प्रत्यारोपण केंद्र व नेत्र रुग्णालयामध्ये करण्यात आले. अमरावतीमधील खासगी रुग्णालयामध्ये २१ नेत्र प्रत्यारोपण करण्यात आले, असे एकूण ७५ लोकांना अमरावतीमधून दान झालेल्या डोळ्यांमुळे दृष्टीलाभ झाला आहे.

ही घ्या काळजी

मृत्यूनंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. जसे मृत्यूनंतर सहा-आठ तासांपर्यंत नेत्रदान केल्या जाऊ शकते. त्यामुळे मृत्यूनंतर ताबडतोब आय बँकेशी संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली दोन उशा ठेवाव्या. पंखा बंद ठेवावा. एसी असेल तर सुरू ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com